महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारच्या अयोग्य धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शरद पवार - maharastra assembly election 2019 news

कोपरगाव येथील राष्ट्रवादीचे उमेदवार अशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची यांची सभा झाली. या वेळी पवारांनी मोदी, शाह-फडणवीसांवर जोरदार टीका करत त्यांचा समाचार घेतला.

शरद पवार

By

Published : Oct 15, 2019, 8:48 AM IST

अहमदनगर- 'देशात आणि राज्यात आज सरकारी यंत्रणांचा वापर सुडाचं राजकारण करण्यासाठी केला जातो आहे. मात्र, आज तुम्ही सत्तेत आहात उद्या नसाल. आम्ही सुडाचं राजकारण करणार नाही. मात्र, याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील जाहीर सभेच बोलताना दिला.

शरद पवार

हेही वाचा-शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर

कोपरगाव येथील राष्ट्रवादीचे उमेदवार अशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांची यांची सभा झाली. या वेळी पवारांनी मोदी, शाह फडणवीसांवर जोरदार टीका करत त्यांचा समाचार घेतला. राज्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतात काही पिकत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो आहे. सरकारचे यावर काहीच धोरण नाही. सरकारच धोरण योग्य नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मुख्यमंत्र्याच्या सभेपूर्वी शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याने भाजपचा शर्ट घातला होता. तुमच स्वागत करतो, अशी चिठ्ठी त्याने लिहिली होती. एवढी टोकाची भूमिका शेतकरी घेत आहेत. असे पवार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details