शिर्डी -भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी लाभक्षेत्राला मिळावे या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीने शुक्रवारी श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या आहे. प्रवरा नदीत ओझरपर्यंत प्रवरा नदी 'ब' कालवा घोषित केलेली आहे. त्यामुळे कालव्यात बांध घालता येत नाही. पण तरीही राजरोसपणे या कालव्यात बेकायदेशीर बंधारे, विहिरी खोदण्यात आल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.
शिर्डीत पाण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ४ तास ठिय्या - प्रवरा नदी
भंडारदरा धरणाचे हक्काचे पाणी लाभक्षेत्राला मिळावे या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीने शुक्रवारी श्रीरामपूर प्रांत कार्यालयासमोर चार तास ठिय्या आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या.
![शिर्डीत पाण्यासाठी प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ४ तास ठिय्या](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3896387-thumbnail-3x2-kalava.jpg)
पुर्वी धरण भरलेले असताना महिन्याला आवर्तन व्हायचे. आता ते कालबाह्य झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त उपसा करता यावा म्हणून शेतीचे आणि पिण्याचे आवर्तन जाणीवपुर्वक स्वतंत्र सोडण्याची प्रथा सुरू झाली आहे. धरणाच्या प्रकल्प अहवालात प्रोफाईल वॉलची तरतुद नसताना नदीची झिज होते, असे कारण देऊन सत्तेच्या बळावर प्रोफाईल वॉल करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. पिण्याचे आणि शेतीचे आवर्तन एकत्र सोडावे व प्रस्तावीत 29 प्रोफाईल बंधार्यांना परवानगी देवू नये आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.