संगमनेर(अहमदनगर)-तालुक्यातील पठारभागातील जांबुत बुद्रुक येथील एका चाळीस फुट खोल विहीरीत पडलेल्या हरणाला शेतकर्यांनी जीवनदान दिले आहे. हरणाला सुखरूप बाहेर काढत त्याला पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले आहे. ही घटना शनिवार सकाळी घडली आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील जांबुत बुद्रुक शिवारात यशवंत मेंगाळ,नामदेव मेंगाळ,नारायण मेंगाळ ,फारूक सय्यद या चौघा शेतकर्यांची एकत्रीत विहीरआहे. शनिवारी सकाळी हे सर्व जण विहीरीपासून काही अंतरावर काम करत होते. त्याच वेळी एक हरण विहीरीत पडले. हे सर्व दृश्य पाहून या शेतकर्यांनी विहीरीच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर शेतकर्यांनी हरणाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. मात्र हरणाच्या पायाला जखम झाल्याने शेतकर्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, हरणाच्या पायावर औषध उपचार करून त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले आहे.