महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांचे आंदोलन मागे, मंगळवारी मुंबईत बैठक

शेतकऱ्यांच्या पंधरा मागण्या घेऊन गेल्या चार दिवसांपासून पुणतांबा येथे सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या मंगळवारी (दि. 7 जून) मुबईत मंत्रालयात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांशी बैठकीत चर्चा करुन बुधवारी (दि. 8 जून ) आंदोलन संपले की पुढे सुरू ठेवायच याबाबत पुन्हा पुणतांब्याच्या ग्रामसभेत निर्णय जाहीर केला जाणार आहे.

पुणतांबा
पुणतांबा

By

Published : Jun 4, 2022, 5:35 PM IST

अहमदनगर -शेतकऱ्यांच्या पंधरा मागण्या घेऊन गेल्या चार दिवसांपासून पुणतांबा येथे सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या मंगळवारी (दि. 7 जून) मुबईत मंत्रालयात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांशी बैठकीत चर्चा करुन बुधवारी (दि. 8 जून ) आंदोलन संपले की पुढे सुरू ठेवायच याबाबत पुन्हा पुणतांब्याच्या ग्रामसभेत निर्णय जाहीर केला जाणार आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन मागे
राज्यातील विविध कारणाने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. त्यामुळे देशात प्रथम पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी 2017 साली शेतकरी संप केला होता. त्यानंतर पाच वर्षानंतर पुन्हा पुणतांब्यात शेतकऱ्यांनी आंदोलनाची मशाल पेटवत 1 जूनपासून शेतकऱ्यांनी पुणतांब्याच्या ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सरकारने दखल घेतली. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे थेट पुणतांब्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात किसान क्रांतीच्या कोअर समीतीच्या सदस्यांशी कृषी मंत्र्यांची प्रदीर्घ तीन तास चर्चा झाली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजीत पवारांशी ही फोनवर चर्चा झाली बैठकीत अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर येत्या मंगळवारी शेतकऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आल्याने चार दिवसांपासून सुरू असलेले धरणे आंदोलन स्थगीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी मुबईत चर्चा झाल्यानंतर पुन्हा पुणतांब्यात येऊन ग्रामसभेत पुढे आंदोलन करायच की आंदोलन थांबवायचा याचा निर्णय घेतला जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details