अहमदनगर- शेवगावचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ व शिवांजली रुग्णालयाचे संचालक डॉ. हंसराज बोडखे यांनी आत्महत्या केली आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम नजीक घडली. डॉ. बोडखे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या मित्रपरिवाराने मंगळवारी त्यांचा शोध घेतला. त्यांना प्रवरासंगम नदी पात्रात त्यांचा मृतदेह आढळला.
रविवारी रात्री साडे दहा वाजेपासून डॉ. बोडके बेपत्ता होते. त्यानंतर त्यांची गाडी क्र. (एम.एच. १६ बी. झेड. २०५५) ही प्रवरासंगमच्या पुलाजवळ बेवारस अवस्थेत काहींना दिसून आली. त्यानंतर त्यांची बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. नंतर त्यांच्या मित्र परिवाराने त्यांची शोधाशोध केली. परंतु, सोमवारी रात्रीपर्यंत त्यांचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी त्यांच्या मित्रपरिवाराने व नातलगांनी त्याची शोधाशोध केली असता दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांचा मृतदेह प्रवरासंगम परिसरातील मंदिरा शेजारी प्रवरा नदीपात्रात तरंगताना आढळून आला.