महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 17, 2020, 9:47 AM IST

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : प्रसिद्ध मोहटादेवी मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी शासन, आरोग्य विभागाने सांगितलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून श्री जगदंबा देवी न्यासाने पुढाकार घेत आज मंगळवार पासून भाविकांना दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध मोहटादेवी मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद
प्रसिद्ध मोहटादेवी मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद

अहमदनगर - जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध श्री जगदंबा मोहटादेवी मंदिर कोरोना विषाणू फैलावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून पुढील आदेश निघेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल सोमवारी श्री जगदंबा देवी न्यासाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्रसिद्ध मोहटादेवी मंदिर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद

पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या मोहटादेवी गडावर राज्याच्या विविध जिल्ह्यातील भाविक रोज मोठ्या संख्येने येत असतात. या ठिकाणी भाविकांची मोठी संख्या असते. तसेच येत्या काळात वासंतिक चैत्र उत्सव, रामजन्मोत्सव, ६४ योगिनी, दशमहाविद्या, अष्टभैरव देवता स्थापना वर्धापन आदी उत्सव तोंडावर आहेत. या अनुषंगाने राज्यभरातील भाविक या कार्यक्रमांसाठी हजारोंच्या संख्येने येण्याची शक्यता असते.

हेही वाचा -साईबाबांच्या मंदिरात व्हीव्हीआयपी पासेस बंद; मंदिर प्रशासनाचा निर्णय

त्यामुळे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी शासन, आरोग्य विभागाने सांगितलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून श्री जगदंबा देवी न्यासाने पुढाकार घेत आजपासून भाविकांना दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा -अहमदनगरमधील कोरोना संशयिताला 'स्वाईन फ्लू'ची लागण...

ABOUT THE AUTHOR

...view details