महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Sai Sansthan Defamation Message: म्हणे, साई संस्थानने हजला देणगी दिली अन् राममंदिराला नाकारली; ही तर बदनामीच

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी साईबाबांच्या पाठोपाठ आता साई संस्थानचीही बदनामी करण्यात येत आहे. साई संस्थानने हजसाठी 35 कोटींची देणगी दिली; मात्र याच संस्थानने अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी देणगी देण्यास नकार दिला होता, असा खोटा व विखारी प्रचार समाजमाध्यमांतून जगभर सुरू आहे.

Shirdi Sai Sansthan Defamation Message
साईबाबा

By

Published : Apr 24, 2023, 5:30 PM IST

अहमदनगर: इंग्रजी आणि विविध प्रादेशिक भाषांमधून अगदी बेमालुमपणे सुरू असलेल्या या प्रचारातून साई संस्थानला बदनाम करण्याबरोबरच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव आहे. याद्वारे साईबाबांच्या सर्वधर्म समभावाच्या प्रतिमेलाही छेद देण्याचा छुपा प्रयत्न सुरू आहे.


संस्थानावर शासन, न्यायालयाची देखरेख:मुळात साईसंस्थानच्या घटनेतच अशा निधीची तरतुद नाही. राज्य शासनाच्या नियंत्रणात असलेल्या साई संस्थानला २००४ पासून राज्य शासनाची त्याबरोबरच २०१३ पासून उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय भूकंपग्रस्तांनासुद्धा निधी देता येत नाही. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली काम करणारे संस्थान जिल्हा प्रधान न्यायाधीशांच्या नेतृत्वात कार्य करत आहे. प्रत्येक निर्णय उच्च न्यायालय व राज्य शासनाची कायदेशीर मान्यता घेऊन वेबसाईटवरून जाहीर करण्यात येतो. मौन बाळगण्याची सवय वगळता संस्थानच्या पारदर्शक कामाबद्दल शंका घ्यायला जागा नाही.

'यावर' संस्थानने भूमिका घ्यावी:भारतातून वेगवेगळ्या ठिकाणांहून साईबाबा व संस्थानच्या बदनामीचे येणारे संदेश वेदनादायक आहेत. भाविक आणि संस्थान गप्प का बसले कळत नाही. आता भक्तांनीच या अपप्रचाराला प्रत्युत्तर देऊन बदनामीचे षड्‌यंत्र हाणून पाडले पाहिजे. या अपप्रचाराचा भाविकांच्या गर्दीवर यत्कींचतही परिणाम झालेला नसला तरी भाविकांच्या भावना जपण्यासाठी साईसंस्थानने कणखर भूमिका घ्यायला हवी, असे शिर्डी ग्रामस्थ म्हणाले आहेत.


बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणार:साई संस्थानच्या घटनेत असा निधी देण्याची तरतुदच नाही. कोणी मागणीही केलेली नाही. त्यामुळे कुणाला निधी देण्याचा वा नाकारण्याचा प्रश्नच नाही. या अपप्रचाराबाबत आम्ही बदनामी करणारे तसेच यु-ट्युब, ट्युटर, फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे, यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव म्हणाले आहे.

साई संस्थानच्या नावाखाली फसवणूक: साईभक्तांच्या आस्थेला आणि खिशाला खात्री लावण्याचे काम ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याकडून आता केले जात आहे. साई संस्थानच्या द्वारावती भक्त निवासातील खोल्या बुक करण्यासाठी गुगलवर सर्च केल्यानंतर एक मोबाइल नंबर दिला गेला आहे. साई संस्थान मार्फत चालविल्या जाणाऱ्या द्वारावती भक्त निवासाचे फोटो ही टाकण्यात आले आहेत. रुम बुकींगसाठी 7602853094 या नंबरवर फोन केल्यानंतर रुम बुक करण्यासाठी क्रेडीट कार् द्वारे पेमेंट करा, असे सांगत पुढील प्रक्रिया करत भक्तांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हेही वाचा:CM Eknath Shinde Reply Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींवरील ठाकरेंची टीका वैयक्तिक द्वेषातून; मुख्यमंत्री शिंदेंचे प्रत्युत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details