महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते साई मंदिरात पार पडला तुळशी विवाह - दिपक मुंगळीकरयांच्या हस्ते साई मंदिरात तुलसी विवाह

शिर्डीत साईबाबांनी वास्तव्य केलेल्या मशीदीत अर्थात द्वारकामाईत एक तुळशी वृंदावन आहे. दरवर्षी एकादशीला साई संसथानच्या वतीने इथे तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते तुळशी विवाहाचे विधी करण्यात आले.

संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते साई मंदिरात पार पडला तुळशी विवाह

By

Published : Nov 10, 2019, 8:54 AM IST

अहमदनगर - दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने यावर्षीही शिर्डी साई संस्थानातर्फे तुळशी विवाहाचा कार्यक्रम पार पडला. साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते तुळशी विवाहाचे विधी करण्यात आले.

संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांच्या हस्ते साई मंदिरात पार पडला तुळशी विवाह

शिर्डीत साईबाबांनी वास्तव्य केलेल्या मशीदीत अर्थात द्वारकामाईत एक तुळशी वृंदावन आहे. दरवर्षी एकादशीला साई संसथानच्या वतीने इथे तुळशी विवाह सोहळा साजरा केला जातो. काल(9 नोव्हेंबर) मोठ्या उत्सवात गोरज मोहर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.

हेही वाचा -तुळशीचे रोपे व लाडू वाटून साजरा केला आषाढी एकादशीचा उत्सव; ठाण्यातील युवकांचा उपक्रम

दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी सर्वत्रतच तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुळशी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. तुळशी वृंदावन सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, दागिने घालतात. मंगळसूत्र, जोडवी, खणा-नाराळाने तुळशीची ओटी भरतात. तुळशीसाठी परंपरेनुसार नैवद्याचे गोड पदार्थ केले जातात.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details