महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीतून इच्छूक; अपक्ष लढण्याचीही तयारी - भाजप

सध्या भाजपमध्ये असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. शिर्डी लोकसभा मतदार संघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे

By

Published : Mar 12, 2019, 7:16 PM IST

अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदार संघातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. सध्या भाजपमध्ये असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीत आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी कार्यकर्ते ठरवतील त्या पक्षाकडून नाही, तर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे वाकचौरे यांनी म्हटले आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे


भाऊसाहेब वाकचौरे आता भाजपमध्ये असून भाजपच्याच वतीने शिर्डी साईबाबा संस्थानचे विश्वस्त पद त्यांच्याकडे आहे. 2009 साली भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेकडून शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत रामदास आठवलेंचा पराभव केला होता. यावेळी मोठ्या मतांनी वाकचौरे निवडून आले होते. मात्र 2014च्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही वाकचौरेंनी शिवसेनेला राम राम करत काँग्रेसमध्ये जावून निवडणूक लढविल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे वाकचौरे यांनी लगेच भाजपमध्ये प्रवेश करून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र येथेही काँग्रेसचे कांबळे यांनी वाकचौरे यांचा पराभव केला. यानंतर भाऊसाहेब वाकचौरे यांना भाजपने साई संस्थानचे विश्वस्त पद दिले आहे.


आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज शिर्डी लोकसभा मतदार संघात आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी वाकचौरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, तालुका तसेच गावात जावून कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. त्यांच्या मनात काय आहे, जाणून घेऊन पक्षाकडून लढायचे की अपक्ष याचा निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र शिवसेना आणि भाजपची युती असल्याने शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनेकडे आहे. तर नगर दक्षिणची भाजपकडे. मग वाकचौरे शिर्डी लोकसभेतून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याचा मोठा पेच वाकचौरे यांच्यासमोर उभा राहिला आहे. एकीकडे वाकचौरे शिवसेनेकडे शिर्डीची जागा मागत असल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना सोडून काँग्रेसकडे गेलेल्या वाकचौरेंना पुन्हा शिर्डीतून शिवसेना संधी देणार का आणि शिवसेनेने वाकचौरेंना संधी दिली नाही, तर वाकचौरे भाजपशी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढणार का, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details