अहमदनगर- हिंदू धर्म जाणून घ्यायचा असेल तर प्रभू श्री. रामचंद्राला जाणावे लागेल. लाखो वर्षे उलटून गेली, मात्र आजही श्री. रामाच्याप्रती भाव प्रत्येकाच्या मनात असून प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार राममंदिर उभारणीसाठी दान द्यावे, असे आवाहन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
प्रतिक्रिया देताना सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज हेही वाचा -अहमदनगरमध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात
श्री. रामाची जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या येथील राममंदिर उभारणीसाठी उत्तर नगर जिल्हा निधी समर्पण अभियान शिर्डी शहरात राबविण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जेष्ठ नेते गजानन शेर्वेकर, जितेंद्र शेळके, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आदी मान्यवरांसह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला भगिनीसह शिर्डी गावचे ग्रामदैवत मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात विशाल कोळगे यांनी सांगितले की, रामजन्मभूमीसाठी साडेपाचशे वर्षापासून हिंदू कारसेवकांनी लढा दिला. त्यामुळे, आज अयोध्येत रामजन्मभूमीत भव्यदिव्य राममंदिर उभारण्यात येत आहे. यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते श्री. रामाच्या मूर्तीची विधीवत पुजा करण्यात आली. तत्पुर्वी शिर्डी शहरातून दुचाकी, तसेच ज्योत रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, शिर्डी शहरातील कारसेवकांचा सत्कार महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी, राममंदिर उभारणीसाठी प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार दान द्यावे. राममंदिर उत्सव साईबाबांनी सुरू केला. राममंदिर शिर्डीत व्हावे अशी साईबाबांची इच्छा होती, असे रामगिरी महाराज यांनी सांगितले. यावेळी भाविकांनी चेकद्वारे, तसेच रोखस्वरुपात दान दिले.
हेही वाचा -नगरमध्ये बर्डफ्लूचा शिरकाव.. कावळ्यांचा मृत्यू बर्डफ्लूनेच, शेकडो कोंबड्या मेल्याने नागरिकांत घबराट