अहमदनगर- कोरोनाच्या पहिल्या व दुसर्या लाटेत राज्य सरकारने अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे. मात्र, टास्क फोर्सने सांगितलेल्या धोक्यानुसार तिसरी लाट अत्यंत मोठी असू शकते. यापासून स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबाच्या बचाव करण्याकरता प्रत्येकाने काळजी घ्या, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी समवेत आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे ,सभापती सुनंदाताई जोर्वेकर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.
तिसर्या लाटेचा धोका रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
दुसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता यामुळे काही प्रमाणात मृत्यू झाले. सरकारने मात्र, अत्यंत पारदर्शकपणे काम करताना कोणताही आकडा लपवला नाही. उलट काही रायांनी आखले लपवले त्यांचे मोठे हाल झाले. संगमनेरातील स्थानिक प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले आहे.
पाच लाख लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो
दुसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता यामुळे काही प्रमाणात मृत्यू झाले. सरकारने मात्र, अत्यंत पारदर्शकपणे काम करताना कोणताही आकडा लपवला नाही. उलट काही रायांनी आखले लपवले त्यांचे मोठे हाल झाले. संगमनेरातील स्थानिक प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले आहे. टास्क फोर्सने दिलेल्या संकेतानुसार तिसरी लाट ही मोठी भयानक आहे. यामध्ये पन्नास लाख रुग्ण असू शकतात. तर पाच लाख लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासनाने ताबडतोब शोध मोहीम सुरू करून तपासणी व त्यावर उपचार करावेत. या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हाच कोरोना वाढ रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय आहे. याबाबत कोणीही निष्काळजीपणा करू नका. कारण दुसर्या लाटेमध्ये आपल्या जवळचे अनेक जण सोडून गेले. हे दु:ख भयावह आहे. तिसऱ्या लाटेमध्ये अत्यंत मोठा धोका आहे. म्हणून काळजी घेणे हाच आपल्यापुढे सर्वोत्तम उपाय आहे. आगामी धोका लक्षात घेऊन ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला असून राज्यात तीन हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
निष्काळजी करू नका
संगमनेर तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, विविध खाजगी रुग्णालये या ठिकाणी सुद्धा ऑक्सीजन प्लांट सुरू करण्यात आले आहे. तालुक्यात साधारण तीन हजार रुग्णांचा धोका होऊ शकतो त्यामुळे वाढीव बेड्स ऑक्सीजन तयारी व इतर बाबींची पूर्तता करणे यावर प्रशासनाने भर दिला आहे याचबरोबर नागरिकांनी या कामात सहकार्य करताना गर्दी टाळा, कोणत्याही आजाराचे लक्षण आढळले तर तातडीने वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घ्या, कोणताही निष्काळजी करू नका करू नका, असे आवाहन थोरातांनी केले आहे.
तिसरी लाट मोठी
आमदार डॉ. तांबे म्हणाले की, तिसरी लाट मोठी असल्याने नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनात सज्ज झाले असून कोरोना रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी एकजुटीने काम करूया. या काळात नागरिकांचे सहकार्य अत्यंत गरजेचे आहे. खाजगी रुग्णालयांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑक्सिजन निर्मिती तातडीने सुरू करावी, अशा सूचनाही थोरातांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी म पुढील उपाययोजना याबाबत सांगितले, की सध्या 3500 बेडची तयारी करण्यात आली असून लहान मुलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. लसीकरणासाठी ही ग्रामपातळीवर सुविधा केल्या जात आहेत. या सर्वांमध्ये नागरिकांचीही सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.