महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 15, 2020, 2:37 PM IST

Updated : Mar 15, 2020, 2:47 PM IST

ETV Bharat / state

कोरोना : मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे त्यांच्याच खासदाराकडून शिर्डीत उल्लंघन

शिर्डी परिक्रमा आयोजीत केलेल्या 'शिर्डी ग्रीन अँन्ड क्लिन'च्या सदस्यांना प्रशासनाने परिक्रमा यात्रा स्थगित करावी, असे आदेश दिले असतानाही आज परिक्रमा काढण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू, नये असे आदेश देवूनही त्यांच्याच पक्षाचे शिर्डीचे खासदार सदाशीव लोखंडे यांनी यात्रेत सहभाग घेतला होता.

कोरोना
कोरोना

शिर्डी (अहमदनगर) - सीमेला परिक्रमा करण्यासाठी आज हजारो भक्तांच्या उपस्थितीत शिर्डीत साई परिक्रमा पार पडली. एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करू नये, असे आदेश प्रशासनाचे आहेत. शिर्डी परिक्रमा आयोजीत केलेल्या 'शिर्डी ग्रीन अँन्ड क्लिन'च्या सदस्यांना प्रशासनाने परिक्रमा यात्रा स्थगित करावी, असे आदेश दिले असतानाही आज परिक्रमा काढण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी करू, नये असे आदेश देवूनही त्यांच्याच पक्षाचे शिर्डीचे खासदार सदाशीव लोखंडे यांनी यात्रेत सहभाग घेतला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे त्यांच्याच खासदाराकडून शिर्डीत उल्लंघन

गेल्या तीन महिन्यांपासून 11 ते 15 मार्च दरम्यान शिर्डी महोत्सवाची तयारी सुरू होती. महोत्सवातील इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र, आजच्या शिर्डी परिक्रमेची जोरदार तयारी शिर्डी ग्रीन अ‌ॅण्ड क्लिनच्या सदस्यांनी आणि शिर्डी ग्रामस्थांनी केली होती. दुसरीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारी आपत्ती निवारणी कायद्यान्वये गर्दी करणारे कार्यक्रम आयोजीत करू, नये असे आदेश काढले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिर्डी परीक्रमाही स्थगित करावी, असे आदेश आयोजकांना कालच जिल्हा प्रशासनाने काढले होते.

हेही वाचा -रायगडमध्ये एकाला कोरोनाची लागन, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क

रात्री उशिरा आयोजकांनीही परिक्रमा स्थगित करण्यात आल्याचे पत्रक काढले होते. तरी आज पहाटे सहा वाजता शिर्डीतील खंडोबा मंदिरापासून ही यात्रा काढण्यात आली होती. यात्रेत देशभरातून आलेले अनेक भाविक आणि शिर्डी ग्रामस्थ सहभागी झाले होते. या यात्रेत शिवसेनेचे शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही सहभाग घेत कोरोनापासून मुक्ती मिळावी, यासाठी साईबाबांकडे प्रार्थना केली. गर्दी करू नये असे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, असे त्यांना विचारले असता, यावर रोज सकाळी लोक फिरतात आजही फिरायला आलेत, असे सांगत त्यांनी अंग झटकण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा -गोंदिया : सी-६० पथकातील पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

आजच्या परिक्रमा यात्रेत सपनावत, इंदोर, रतलाम येथील भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. साईबाबांच्या आशीर्वादासाठी ही परिक्रमा यात्रा काढली. कोरोना विषाणूचे संकट दूर व्हावे, यासाठी साईबाबांना साकडे घातल्याचे तसेच बाबांनी पटकीसारखी महामारी आली असताना पीठ दळून शिर्डीच्या सीमा वर महामारी रोखली होती तिच आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भावना असल्याचे मत त्यांनी वक्त केले. शिर्डीच्या सीमेवर चौदा किलोमीटरच्या या यात्रेत काही भाविक मास्क लावूनही सहभागी झाले होते.

Last Updated : Mar 15, 2020, 2:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details