शिर्डी -धार्मिक स्थळ असो अथवा पर्यटन स्थळ आशा ठिकाणी अडचणी आल्यास अनेकदा पोलिसांची मदत तात्काळ मिळत नाही, दरवर्षी शिर्डीमध्ये करोडो भाविक येत असतात. शिर्डीत येणाऱ्या भाविकांना तातडीने मदत मिळावी यासाठी शिर्डीत टुरिझम पोलीस केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनाला येत असतात. मात्र अनेक भाविकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये चोरी, मिसिंग अशा प्रकरणांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत येणाऱ्या भाविकांना तातडीने पोलिसांची मदत मिळावी म्हणून, मंदिर परिसरामध्ये टुरिझम पोलीस केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.