महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना बजावली नोटीस

नोटीस बजावल्या नंतर पुढील 48 तासात योग्य तो खुलासा न आल्यास कारवाईचा ईशारा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील सर्व अकरा उमेदवारांनी खर्च सादर केला.

खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना बजावली नोटीस

By

Published : Oct 12, 2019, 11:42 PM IST

अहमदनगर- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे घनश्याम शेलार यांच्यासह पाच उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी सादर केलेल्या खर्चात त्रुटी आणि अनियमितता असल्या कारणाने ही नोटीस बजावली आहे. या मतदार संघात यांच्यातच मुख्य लढत होत आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या खैरती यामुळे जोर धरणार आहेत.

हेही वाचा-'भाजप-सेनेचे राजकारण जाती-धर्माच्या नावाने जनतेत दुफळी निर्माण करणारे'

नोटीस बजावल्या नंतर पुढील 48 तासात योग्य तो खुलासा न आल्यास कारवाईचा ईशारा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात एकूण अकरा उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील सर्व अकरा उमेदवारांनी खर्च सादर केला. मात्र, यात पाचपुते, शेलार यांच्या सह अपक्ष सुनील उडमले, बसपाचे सुनील ओहळ, आणि बाळू जठार या उमेदवारांच्या सादर खर्चात त्रुटी आणि अनियमितता असल्याचे निर्णय अधिकाऱ्यांचे मत झाले. त्यामुळे या उमेदवारांना नोटीस बाजवल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details