अहमदनगर- शिर्डी येथील साईबाबा मंदिरातील कर्मचा-यांवर आता कॅमेऱ्याची नजर असणार आहे. साईबाबा मंदिरातील प्रवेशद्वार क्रमांक 4 वर फेस डिटेक्शन कॅमेरा बसवण्यात आला आहे. यामुळे कर्मचारी कोणत्या वेळी कामावर आले याची नोंद होणार आहे, अशी माहिती साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.
साईबाबा संस्थानच्या विविध विभागात शेकडो कर्मचारी काम करत असतात. तीन शिफ्टमध्ये सर्व विभागांचे काम सुरू असते, यामुळे कामावर येणारे कर्मचारी कधी येतात, कधी जातात यावर नजर ठेवणे अवघड होते. मात्र,आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यासाठी केला जाणार आहे.