महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत विद्युत रोहित्रांची अवस्था बिकट; संभाव्य धोका टाळण्यासाठी दुरुस्तीची मागणी - Shirdi News

शिर्डी शहरात महाराष्ट्र विद्युत वितरणाच्या रोहित्रांचे तीनतेरा वाजले आहेत. साई मंदिर ते नविन पिंपळवाडी रस्त्यावरील साईश कॉर्नर येथे अति गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्राची अवस्था खुपच बिकट आहे. या रोहित्राची लवकरात-लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

By

Published : Aug 28, 2019, 7:38 PM IST

अहमदनगर -शिर्डी शहरात महाराष्ट्र विद्युत वितरणच्या रोहित्रांचे तीन-तेरा वाजले आहेत. साई मंदिर ते नविन पिंपळवाडी रस्त्यावरील साईश कॉर्नर येथे जास्त गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत रोहित्रांची अवस्था खूपच बिकट आहे.

या रोहित्राद्वारे शहरातील पिंपळवाडी रोड परिसरात विद्युत पुरवठा केला जातो. या रोहित्रामुळे रहदारी करणाऱ्यांना याचा त्रास होऊ शकतो. याच भागात जिल्हा परिषदेची शाळा असून विद्यार्थी देखील या मार्गाचा वापर करतात. खराब विद्युत रोहित्रामुळे अपघात होऊन विजेचा धक्का ही बसू शकतो. महावितरणचे कर्मचारी विज बिलाचे पैसे घेण्यासाठी वेळेवर येतात. त्यांना हा रोहित्र दिसत नसेल का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. विद्युत रोहित्राची लवकरात-लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details