अहमदनगर - देश-विदेशातील भाविकांसह अतिमहत्वाच्या तब्बल २ कोटी लोकांनी गेल्या (२०१९) वर्षभरात साईदरबारी हजेरी लावली. त्यापैकी १ कोटी ६३ लाख भाविकांनी साई संस्थान प्रसादालयात भोजनाचा आस्वाद घेतला. यामध्ये तब्बल ९ लाखांची वाढ झाली आहे.
वर्षभरात २ कोटी भाविक साईचरणी, करोडो भाविकांनी घेतला साई भोजनाचा लाभ - १ कोटी ६३ लाख भाविकांनी साई संस्थान
देश-विदेशातील भाविकांसह अतिमहत्वाच्या तब्बल २ कोटी लोकांनी गेल्या (२०१९) वर्षभरात साईदरबारी हजेरी लावली. त्यापैकी १ कोटी ६३ लाख भाविकांनी साई संस्थान प्रसादालयात भोजनाचा आस्वाद घेतला. यामध्ये तब्बल ९ लाखांची वाढ झाली आहे.
शिर्डीत दररोज जवळपास ६० हजारांच्या आसपास भाविक दर्शन घेतात. शिर्डीचे फ्लोटींग पॉपुलेशन हे दररोज एक लाखाच्या वर आहे. साई दर्शनाला येणाऱ्या बहुतांशी भाविकांसह शिर्डीत रोजीरोटीसाठी आलेले अनेक जण येथे साई संस्थानच्या साई प्रसादालयात भोजणाचा आस्वाद घेतात. साई संस्थानने उभारलेल्या प्रसादालयात एकाच वेळी ५ हजार भाविक भोजन करु शकतात. या व्यतिरिक्त व्हिआयपी लोकांना बसण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. साई संस्थान भक्तांनी अन्नदान म्हणून दिलेल्या देणगीतून भक्तांना मोफत जेवण दिले जाते. तर व्हिआयपी भोजन घेणाऱ्यांकडून ५० रुपये शुल्क आकारले जाते. दररोज हजारो लोक जेवण करतात. त्यांना दोन भाज्या चपाती दाळ भात असे रुचक जेवण देण्यात येते. दररोज सकाळी दहा ते रात्री दहा असे बारा तास अविरत भोजन सुरू असते. या वर्षी तब्बल 1 कोटी 59 लाख 96 हजार 94 भाविकांनी मोफत भोजनाचा लाभ घेतला.
साईबाबा संस्थान चालवत असलेल्या या प्रसादालयासाठी सौर ऊर्जोचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा कार्बन उत्सर्जन थांबवला जातो. या वर्षभरात प्रसादालयाला देणगी स्वरुपात 8 कोटीच्या रुपयांचे दान आले आहे. तर 5 कोटी व्हिआयपी तिकिटातून मिळाले आहेत. 37 लाख 68 हजार 543 लाडू विकले गेलेत. त्यातून 1 कोटी 88 लाख 42 हजार 715 रुपये मिळाले आहेत. एका भोजन ताटासाठी साधारणता: 25 रुपये खर्च येतो. प्रसादलयाचा वार्षिक टर्न ओव्हर हा 33 कोटी रुपयांच्या वर आहे.