महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#व्हिडीओ: मॉक ड्रिलवेळी पोलिसांनी फोडलेल्या अश्रूधुराच्या नळकांडीने विद्यार्थी जखमी - संगमनेर मॉक ड्रिल

संगमनेरमध्ये मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक सुरू असताना पोलिसांनी फेकलेली अश्रू धुराची एक नळकांडी विद्यार्थ्याच्या पायामध्ये फुटल्याने तो जखमी झाला आहे.

mock drill demonstration
#व्हिडीओ: संगमनेरमध्ये मॉक ड्रिलच्या प्रात्यक्षिकामध्ये पोलिसांनी फोडलेल्या अश्रू धुराच्या नळकांडीमुळे विद्यार्थी जखमी

By

Published : Feb 26, 2020, 11:34 PM IST

अहमदनगर - संगमनेर बसस्थानकावर पोलिसांनी आज (बुधवारी) जमाव नियंत्रणात आणण्यासाठी सराव केला. हा सराव (मॉक ड्रिल) करत असताना पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर केला. मात्र, हे प्रात्यक्षिक सुरू असताना पोलिसांनी फोडलेल्या अश्रू धुराच्या नळकांडीने बसस्थानकावरील एक विद्यार्थी जखमी झाला.

#व्हिडीओ: संगमनेरमध्ये मॉक ड्रिलच्या प्रात्यक्षिकामध्ये पोलिसांनी फोडलेल्या अश्रू धुराच्या नळकांडीमुळे विद्यार्थी जखमी

हेही वाचा -विधवा शिक्षिकेला लग्नाचे आमिष दाखवत विद्यार्थ्याकडून बलात्कार, १८ लाखाला गंडवलेही

गावाकडे परतण्यासाठी एसटी बसची वाट पाहत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणाच्या दोन्ही पायाच्यामध्ये पोलिसांनी फेकलेली नळकांडी फुटल्याने दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली. यावेळी घटनास्थळी रुग्णवाहिका नसल्याने जखमी झालेल्या महाविद्यालयीन तरुणाला रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांना जीपचा वापर करावा लागला. जखमी झालेल्या महाविद्यालयीन तरुणावर संगमनेर येथील एका खाजगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -'शांतता आणि एकोपा आपल्या संस्कृतीचा मूळ गाभा'; सर्वांनी शांतता बाळगावी'

ABOUT THE AUTHOR

...view details