महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Raosaheb Danve On Mahavikas Aghadi : नरेंद्र मोदींचाही सीबीआयकडून छळ - रावसाहेब दानवे - रावसाहेब दानवे मराठी बातमी

भाजपाच्या नेत्यांनाही ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला. आमच्या लोकांचा छळ केला नाही का?, फक्त तुमच्याच लोकांचा छळ सुरु आहे का?, असा सवाल रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला ( Raosaheb Danve On Mahavikas Aghadi ) केला आहे.

Raosaheb Danve
Raosaheb Danve

By

Published : Feb 27, 2022, 7:59 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) -भाजपाच्या नेत्यांनाही ईडी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्रास दिला. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सीबीआयकडून त्यांचाही छळ करण्यात आला. याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना नाही का? अमित शाह यांनाही सीबीआयने जेल मध्ये टाकले होते. आमच्या लोकांचा छळ केला नाही का?, फक्त तुमच्याच लोकांचा छळ सुरु आहे का?, असा सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला ( Raosaheb Danve On Mahavikas Aghadi ) आहे.

रावसाहेब दानवे यांनी शिर्डीत साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांना बोलताना दानवे म्हणाले, दिशा सालीयन बाबात एकटे नारायण राणे बोलले असे नाही. यापुर्वीही अनेक लोक बोलले होते. मात्र, त्यावेळी गुन्हे दाखल झाले नाही. राज्यात सुडाचे राजकारण सुरु आहे. नवाब मलिकांना अटक केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी एक दिवसाचे उपोषण केले. दाऊदला पाठींबा देण्यासाठी हे उपोषण केले की काय अशी शंका राज्यातील जनतेच्या मनात आल्याचेही राऊत यांनी म्हटलं.

रावसाहेब दानवे प्रसारमाध्यमांशी बोलताना

मराठा आरक्षणावर बोलताना दानवे यांनी सांगितले की, अन्य राज्यात अशा आरक्षणाला स्थगिती दिली नाही. तामिळनाडू सरकारने 50 टक्के आरक्षण दिले. त्यांनी योग्य बाजू न्यायालयात मांडल्याने ते आरक्षण टिकले. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजावर अन्याय केला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल राज्य सरकारने संभाजीराजे छत्रपती यांना अनेक आश्वासने दिली. मात्र, एकही आश्वासन त्यांनी पुर्ण केली नसल्याने संभाजीराजे उपोषणाला बसले आहे. संभाजीराजे यांच्या उपोषणाला आमचा 100 टक्के पाठिंबा असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -मोदी सरकार लवकरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार - भाजप नेते आशिष शेलार

ABOUT THE AUTHOR

...view details