शिर्डी- कोपरगाव तालुक्यातील हंडेवाडी शिवारात क्रेन मशीन विहरीत पलटी होऊन ३ मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर १ मजूर गंभीर जखमी झाला आहे.
विहिरीत क्रेन मशीन पलटी, ३ मजूरांचा जागीच मृत्यू - शिर्डी
कोपरगावमधील हंडेवाडी शिवरात विहिरीचे काम सुरू असताना अचानक क्रेन मशीन विहिरीत पलटी झाल्याने ३ मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. तर १ मजूर गंभीर जखमी झाला आहे. गेल्या महिन्यातच दहिगाव शिवरातही अशाच प्रकारची घटना घडून २ मजूरांचा मृत्यू झाला होता.

हंडेवाडी शिवारातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रमोद लबडे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. या कामासाठी ठेकेदार रवी विठ्ठल जाधव याने इतर भागातून मजूर आणले होते. विहिरीचे काम सुरू असताना अचानक क्रेन विहिरीत पलटी झाली. या घटनेत ठेकेदार जाधवसह इतर २ मजूरांचा जागीच मृत्यू झाला तर १ मजूर गंभीर जखमी झाला आहे. तुकाराम देवसिंग असे त्या जखमी मजूराचे नाव असून पुढील उपचारासाठी त्याला कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, २ मयत मजूरांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.
महिनाभरापूर्वीच दहिगाव शिवारात विहिरीत काम करत असताना 2 मजुरांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता आणि आज पुन्हा अशीच घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.