महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Saibaba Shirdi Temple : खग्रास चंद्रग्रहणामुळे, साईबाबा मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल - Khagras Lunar Eclipse on November 8

8 नोव्हेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण (Khagras Lunar Eclipse on November 8) असल्‍यामुळे साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल (timings daily programs Saibaba Samadhi Temple have changed) करण्यात आला आहे. Saibaba Shirdi Temple

Saibaba Shirdi Temple
दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल

By

Published : Nov 7, 2022, 2:52 PM IST

अहमदनगर :8 नोव्हेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण (Khagras Lunar Eclipse on November 8) असल्‍यामुळे साईबाबा समाधी मंदिराच्‍या दैनंदिन कार्यक्रमांच्‍या वेळेत बदल (timings daily programs Saibaba Samadhi Temple have changed) करण्यात आला असल्याची माहिती, साईबाबा संस्‍थान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. उद्या दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.19 यावेळेत साईबाबांच्या समाधी समोर मंत्रोच्‍चार होणार असल्‍यामुळे, मंत्रोच्‍चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्‍यात येणार आहे. Saibaba Shirdi Temple


दिनांक 8 नोव्‍हेंबर 2022 रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 6.19 याकाळात खग्रास चंद्रग्रहण ग्रस्‍तोदित आलेले आहे. यामध्‍ये दुपारी 2.30 वाजता साईबाबांचे दर्शन बंद होईल. दुपारी 2.39 वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्‍चार सुरु होईल. सायंकाळी 6.19 वाजता मंत्रोपच्‍चार संपल्‍यानंतर सायंकाळी 6.30 वा. साईबाबांच्या मूर्तीला मंगलस्‍नान घालण्यात होईल. त्‍यानंतर सायंकाळी 6.45 वाजता साईबाबांची शिरडी माझे पंढरपूर ही छोटीआरती होईल. सायंकाळी 7 वाजता साईबाबांची धुपारती होईल.

आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पुर्वीप्रमाणे सुरु होईल. तसेच सदर ग्रहण काळात साईबाबांच्या समोर मंत्रोच्‍चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती, साईबाबा संस्‍थान मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. तसेच सर्व साईभक्‍तांनी याची नोंद घेवुन सहकार्य करावे, असे आवाहन बानायत यांनी केले. Saibaba Shirdi Temple

ABOUT THE AUTHOR

...view details