महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ahmednagar Hospital Fire : आमच्या विशाखाची चूक काय?; आईवडिलांचा सवाल

सहा नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग(Ahmednagar Hospital Fire) लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तेथील डॉक्टर विशाखा शिंदे(Dr. Vishakha Shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

dr vishakha shindes family
dr vishakha shindes family

By

Published : Nov 17, 2021, 6:28 PM IST

Updated : Nov 17, 2021, 7:02 PM IST

अहमदनगर - गेल्या सहा नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग(Ahmednagar Hospital Fire) लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत डॉ. विशाखा शिंदे(Dr. Vishakha Shinde Arrested) यांना अटक करण्यात आली. मात्र, यात विशाखाची चूक काय? असा सवाल विशाखाच्या आई-वडिलांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर विशाखाच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विशाखाचे आईवडील
  • विशाखाची चूक काय? -

एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर आर्थोच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे या सध्या अटकेत आहेत. मात्र, तिच्यावर चुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एकीकडे शासन 'बेटी बचायो बेटी पढाओ'चा नारा देतात. मात्र, दुसरीकडे शिक्षण घेत असतानाच तिची चूक नसताना इतरांची जबाबदारी तिच्यावर ढकलत गुन्हा दाखल करणे योग्य नसल्याचे विशाखाच्या आई वडिलांनी सांगितले आहे.

डॉ. विशाखा शिंदे
  • विशाखासोबत मलाही कोठडीत टाका - विशाखाची आई

सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यामध्ये पुढे केले असून, ही चुकीची बाब आहे. या प्रकरणाची दखल प्रशासनाने योग्य पद्धतीने घ्यावी. आमच्या मुलीला या प्रकरणात योग्य न्याय मिळवून द्यावा. विशाखावर लावलेला आरोप सरकारने मागे घ्यावा, अशी विनंती विशाखाच्या वडिलांनी केली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी विशाखाची आई म्हणाली की, मोठ्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली विशाखा ड्युटीवर होती तिथे आग लागली. हे ऐकताच माझ्या विशाखाला काही झालं का म्हणून हातपाय गळाले. मात्र, नंतर तिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली, तिला कोठडीत ठेवलं तर मलाही कोठडीत ठेवा.

विशाखा शिंदेचे आईवडील
  • आमच्या मुलीला न्याय द्या -

आमच्या मुलीला फक्त न्याय मिळवून द्यावा. तिच्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे तिच्यावर झालेले आरोप मागे घेण्यात यावेत आणि तिची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी विशाखाच्या आई-वडिलांनी केली आहे. रुग्णालयात आग लागली त्यावेळी डॉ. विशाखा या विभागात ड्युटीवर होत्या. या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या काही नर्स आणि डॉ. विशाखा यांना दोषी ठरववत गुन्हा दाखल केला.

Last Updated : Nov 17, 2021, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details