अहमदनगर- माझा विजय पवार आजोबा आणि थोरात वडिलांमुळे झाला, अशी उपरोधात्मत टीका अहमदनगर दक्षिणचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. त्यांनी विजय मिळवल्यानंतर पवार आणि थोरात यांच्यावर शरसंधान साधले. माझ्या वडिलांनी आता लवकर भाजपमध्ये यावे, असे आवाहनही त्यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना केले आहे.
पवार आजोबा आणि थोरात वडिलांमुळे आजचा विजय - सुजय विखेंची प्रतिक्रिया - sharad pawar
माझा विजय पवार आजोब आणि थोरात वडिलांनमुळे झाला, अशी उपरोधात्मत टीका अहमदनगर दक्षिणचे विजयी उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली. त्यांनी विजय मिळवल्यानंतर पवार आणि थोरात यांच्यावर शरसंधान साधले.
अहमदनगर दक्षिणमध्ये आजच्या विजयानंतर डॉ. सुजय विखे पाटलांनी झालेल्या सत्कार सोहळ्यात शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्यावर खरमरीत उपरोधिक टीका केली. प्रचारादरम्यान त्रास देणाऱ्यांचे लवकरच उट्टे काढले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. विजयाची खात्री होताच एका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी राधाकृष्ण विखे, पालकमंत्री राम शिंदे यांच्यासह भाजप-सेना आणि विखे समर्थक नेते व्यासपीठावर उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात घड्याळाला एकही 'काटा' शिल्लक राहणार नाही, असा इशाराही सुजय विखे यांनी दिला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटलांनी राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांचा पराभव केला.