अहमदनगर - नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर दिग्गज नेत्यांनी आपला मोर्चा आता शिर्डी मतदारसंघाकडे वळवला आहे. नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. २९ एप्रिलला शिर्डी लोकसभेसाठी मतदान होत आहे.
शिर्डी लोकसभा: लोखंडेंच्या प्रचारासाठी सुजय विखे मैदानात, कांबळेंच्या अडचणीत वाढ - SHIRDI
नगर दक्षिणचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील हे शिर्डी लोकसभेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत. २९ एप्रिलला शिर्डी लोकसभेसाठी मतदान होत आहे.
अहमदनगर लोकसभा मतदानानंतर सुजय विखे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवारासाठी प्रचार करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सकाळपासून सुजय विखेंनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराला सुरुवात केली. आज आपल्या पहिले सभेला काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातून सुजय विखेंनी पहिल्या प्रचारसभेला सुरुवात केली. सुजय विखेंनी शिर्डी लोकसभा मतदारसंघात लोखंडेच्या प्रचाराला सुरुवात केल्याने काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.