शेवगाव (अहमदनगर)-शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. खळबळजनक बाब म्हणजे मृतदेहाचे मुंडकेच कोणीतरी कापून नेले आहे. त्याच ठिकाणी एका 10 ते 15 वर्षीय मुलाचाही मृतदेह आढळून आला. मुंडके नसलेला महिलेचा व लहान मुलाचा मृतदेह आढळून आल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दुहेरी हत्याकांडाने शेवगाव हादरले
शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका 60 वर्षीय महिलेचा मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला आहे. त्यापासून काही अंतरावर एका मुलाचाही मृतदेह आढळला आहे. यामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाथर्डी रोडवर असलेल्या आयटीआय लगत मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह पडला आहे, अशी माहिती अज्ञाताने शेवगाव पोलिसांना फोनवरुन दिली. त्यानंतर तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्या महिलेचे मुंडके कोणीतरी कापून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मुंडक्याचा शोध सुरू केला. त्यानंतर जवळच एका 10 ते 15 वर्षे वयातील मुलाचा मृतदेह आढळला. तसेच महिलेच्या मृतदेहाजवळ भांडी, पेटी, गोणपाट, असे साहित्य आढळले आहेत. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत शविवच्छेदनासाठी दोन्ही मृतदेह पाठवले असून पुढील तपास सुरू आहे.