शिर्डी ( अहमदनगर ) : भोंगावादामुळे काल साईमंदिरातील रात्रीची व पहाटेची आरती व मशिदीवरील अजान लाऊडस्पीकर शिवाय ( Shirdi Kakad Aarti Without Loudspeaker ) झाली़. दरम्यान साईबाबांच्या मंदिरावरील लाऊडस्पीकर बंद करू ( Dont Turn Off Sai Mandir Loudspeakers ) नका, अशी मागणी येथील मुस्लीम समुदायाने केली ( Muslim Community Shirdi ) आहे़. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच श्रीसाईबाबा मंदिरातील रात्रीची व पहाटेची आरती लाऊडस्पीकर शिवाय झाली. याशिवाय सर्व मशिदीत नमाज झाली. परंतु अजानसाठी स्पिकरचा वापर करण्यात आला नाही.
याबाबत शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत म्हणाल्या की, आम्हाला पोलीस प्रशासनाकडून पत्र प्राप्त झाले आहे़. त्यात न्यायालयाच्या निर्देशानूसार ( Supreme Court Orders On Loudspeaker ) काही विशिष्ठ निर्देशाचे उल्लंघन करू नये, अशी विनंती करण्यात आली आहे़. त्यानुसार न्यायालयाचे आवाज मर्यादेसंबधी निर्देश आहेत, त्याचे पालन करून साईमंदिरातील सर्व आरत्या पुजाविधी नियमीत व सुरळीत सुरू आहेत़.
साईमंदिरावरील लाऊडस्पीकर ( Loudspeakers On Sai Mandir Shirdi ) बंद न ठेवता पुर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी येथील जामा मशिद ट्रस्ट व मुस्लीम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे़. या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच साईबाबा मंदिरातील रात्रीची व सकाळची आरती लाऊडस्पीकर शिवाय झाली. हे अतिशय वेदनादायक आहे़. साईबाबा देवस्थान हे जागतीक किर्तीचे व सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे़.