महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या लढाईत शिथिलता येऊ देवू नका - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

कोरोनाच्या लढाईत शिथिलता येऊ देवू नका, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाययोजना आढावा बैठकीमध्ये बोलत होते.

By

Published : May 29, 2021, 5:41 PM IST

Don't let the battle of Corona slow down, said Revenue Minister Balasaheb Thorat
कोरोनाच्या लढाईत शिथिलता येऊ देवू नका - महसुलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर - कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक जण निष्काळजीपणा करत आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात रुग्ण सख्येत वाढ झाली आहे. प्रत्येकाने स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असून मास्क वापरणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव कोरोना मुक्त करण्यासाठी आगामी काळात काळजीपूर्वक काम करा, याबाबद कोणीही निष्काळजीपणा करू नका. कोरोनाच्या लढाईत संपूर्ण तालुका कोरोनामुक्त झाल्याशिवाय नागरिकांनी शिथिलता येवू देवू नका असे, आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाय योजना आढावा बैठकीमध्ये बोलत होते.

हे होत उपस्थित -

यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांतअधिकारी डॉ .शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार जर्‍हाड, डॉ. सुरेश घोलप आदी उपस्थित होते.

'तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोणा मुक्तीचा मार्ग' -

यावेळी थोरात म्हणाले, की कोरोना संपलेला नसून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक कोरोना टेस्ट केल्या जात असून त्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसत आहे. तालुक्यात सध्या 50 गावे कोरोनामुक्त झाली आहे. मात्र, आपल्याला प्रत्येक गाव व संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करावयाचा आहे. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामरक्षक सुरक्षा समिती अधिक प्रभावीपणे कार्यान्वित करताना कोणतीही लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीस तातडीने विलगीकरण करा. तपासणी, विलगीकरण व तातडीचे उपचार हा कोरोना मुक्तीचा मार्ग आहे. मात्र, यामध्ये सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. घरगुती समारंभ सुरू करू नका. गर्दी केल्याने पुन्हा कोरोनाचा धोका वाढू शकतो. कोरोनाशी लढताना कोणतीही शिथिलता येवू देऊ नका, असे ही ते यावेळी म्हणाले.

'लसीकरणास प्राधान्य देवून कोरोना होवू शकतो दूर' -

आमदार डॉ. तांबे म्हणाले, की कोरोनाचा स्ट्रेंथ दिवसेंदिवस बदलत आहे. नवा आजार अत्यंत घातक आहे. मात्र, डबल मास्कचा वापर केल्याने आपण कोरोणापासून काही प्रमाणात आपण स्वत:चा बचाव करू शकतो. सर्वांचे लसीकरण होणार आहे. लसीकरणास प्राधान्य देवून कोरोना दूर होवू शकतो. मात्र, या काळात प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे, असे ही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी गावनिहाय माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details