शिर्डी (अहमदनगर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे देणगीवरही परिणाम झाला होता. टाळेबंदीनंतर 16 नोव्हेंबरला शिर्डीतील साई मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे देणगीचा ओघ पुन्हा सुरू झाला आहे. मागील 71 दिवसांत सुमारे 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. याच काळात साई भक्तांनी 32 कोटी 3 लाख 42 हजार 900 रुपयांचे दानही दिले.
71 दिवसांत तब्बल 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी घेतले दर्शन
टाळेबंदीच्या काळातही सुरुवातीचे सहा महिने भक्त ऑनलाइन दर्शन करत साई चरणी दान करत होते. टाळेबंदीनंतर मंदिरे सुरू करण्याची सरकारने परवानगी दिली. त्यानंतर कोरोनाचे नियम पाळत साई भक्त साईबाबांच्या दर्शनाला येऊ लागले. यामुळे 16 नोव्हेंबर ते 25 जानेवारी या कालावधीतील 71 दिवसांत फ्री बायोमेट्रिक दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या 9 लाख 13 हजार 325 असून ऑनलाइन पास काढून 1 लाख 3 हजार 377 भाविकांनी दर्शन घेतले. जनसंपर्क विभागातून 1 लाख 85 हजार 460 भाविकांनी पैसे भरत विशेष दर्शन घेतले, अशाप्रकारे एकूण 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी साईबाबंचे दर्शन घेतले आहे.
1 कोटी 61 लाख 18 हजार 548 रुपयांची मोफत भोजनासाठी देणगी