अहमदनगर (चंद्रापुर) - डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना अनेक रुग्णाचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, त्यांच्या निधनानंतर कुटुबीयांची झालेली वाताहत अक्षरश: पाहवत नाही. रोजच्या जगण्याचा संघर्ष अधिक गडद करणारे संकट वाढत जाणारा हा प्रवास आज अंगावर आलाय अशी परिस्थिती आहे. अहमदनगर जिल्हातील लोणी जवळील चंद्रापुर येथील लव्हाटे कुटुंबाची आज परिस्थिती यापेक्षा काही वेगळी नाही. रोजच्या आडचणींना कसे समोर जायचे हा मोठा प्रश्न उभा आहे. घरातील कर्ते डॉ. देवीदास लव्हाटे यांच्या अकाली जाण्याने आज या कुटुंबाची अवस्था काय आहे आणि कुटुंबाची आजची काय भावना आहे याबाबत ईटीव्ही भारतने आढावा घेतला आहे.
देवीदास यांच्या भावाचेही कोरोनामुळेच त्याच महीन्यात निधन झाले
राहाता तालुक्यातील चंद्रापुर येथील रहीवाशी देवीदास लव्हाटे हे डॉक्टर होते. कोरोना काळात कंत्राटी वैदकीय अधिकारी म्हणून अकोले तालुक्यातील आदिवासी भागत असलेल्या कोतूळ येथे सेवा देत होते. त्या दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्यांच्यावर सरकारी आणि खाजगी रुग्णालयत उपचार सुरू होते. मात्र, वीस दिवसांनंतर त्यांनी शेवटी अखेरचा श्वास घेतला. 12 एप्रिला 2021 रोजी त्यांचे निधन झाले. हे दु:ख काय कमी होते म्हणून त्याच काळात देवीदास यांच्या भावाचेही कोरोनामुळेच त्याच महीन्यात निधन झाले. आज या कुटुंबाचा आधार म्हणून कुणी नाही. त्यातच देवीदास यांचा मुलगा आजारी असतो, पत्नीलाही मनक्याचा त्रास आहे. हे सगळे असताना मुलांकडे पाहून ती आई हा संसाराचा गाडा पुढे ओढत आहे. मात्र, सरकारने 50 लाख रुपयांचा विमा देण्याचे जाहीर केले असतानाही त्यामधील रक्कम आणखी कुटुंबाला मिळाली नाही. त्यामुळे आणखी अडचणी वाढल्या आहेत.
विम्याची मुदत ही 23 मार्चलाच संपली