अहमदनगर - जिल्ह्यात अनेकजण विखे परिवाराच्या विरोधात असले तरी जनता आमच्या पाठीशी आहे. गेली ५० वर्षे विखे परिवाराने राजकारण आणि समाजकारण केले आहे. पुढील ५० वर्षे आम्हाला कोणी हटवू शकत नाही. आम्ही सामान्य गरीब समाज घटकांसोबत असल्याने आम्हाला राजकारणातून हद्दपार करणाऱ्यांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असा टोला डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.
'राजकारणातून विखे परिवाराला हद्दपार करण्याची विरोधकांची स्वप्ने कधीही पूर्ण होणार नाहीत'
गेली ५० वर्षे विखे परिवाराने राजकारण आणि समाजकारण केले आहे. पुढील ५० वर्षे आम्हाला कोणी हटवू शकत नाही.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ४२ अंशावर गेला आहे. तरीसुद्धा रविवारी विखे यांनी नगर तालुक्यातील अनेक गावांना धावत्या भेटी देत मतदारांना निवडून देण्याचे आवाहन केले. माझ्यासमोर विरोधक कोण आहे, किती मोठा आहे, याचा मी विचार करत नाही. ग्रामीण भागात पाण्याची असलेली गरज आणि त्याची पूर्तता झाल्यास होणारा विकास या मुद्यावर मतदारांचे प्रबोधन करत आहे. मतदारसंघात ७५० गावे आहेत. ५०० पेक्षा जास्त गावांना आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. २१ एप्रिलपर्यंत राहिलेल्या गावांतील मतदारांच्या गाठी-भेटी घेणार, असे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे सध्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात गावोगावी प्रचार सभा घेत आहेत. पाणी आणि विकासाच्या मुद्यावर आपण निवडणूक लढवत असल्याचे ते प्रचारसभातून मतदारांना सांगत आहेत.