अहमदनगर -दिवाळी हा सर्वात मोठा सण प्रत्येक जण मोठ्या धुमधडाक्यात साजरा करतो. याच दिवशी शिर्डीच्या साईबाबांनी आपल्या हयातीत पाण्याने दिवे पेटवले होते. त्याचेच स्वरूप मानून लाखो भाविक शिर्डीत येऊन मोठ्या श्रद्धेने साईबाबा मंदिर परिसरातील लेंडीबाग येथे दिवे लावतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने संस्थानच्यावतीने भाविकांविना हा सण यंदा साजरा करण्यात येत आहे.
कोरोनामुळे साईबाबांचे सर्वच उत्सव भाविकांना विना साजरे-
वर्षाभरात शिर्डीत रामनवमी, गुरुपौर्णिमा, साई पुण्यतीथी उत्सव आणि दिवाळी हे सण मोठ्या उत्साहात साई संस्थानकडून साजरे करण्यात येतात. मात्र, यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 17 मार्चपासून साईबाबांचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे या वर्षी सर्व साईबाबांचे उत्सव भाविकांविना साई संस्थानकडून साजरे करण्यात आले आहे.
भाविक अश्या पद्धतीने साजरी करतात साईंच्या शिर्डीत दिवाळी सण-
शिर्डीमध्ये साईबाबांचे एका पडक्या मशिदीत वास्तव्य होते. त्याला ते व्दारकामाई म्हणून सोबधत असत. बाबांनी याच ठिकाणी आपल्या जीवन काळात अनेक चमत्कार केले आहे. ज्यात सर्वात महत्वाचा चमत्कार म्हणजे दिवाळीत साईबाबांनी पाण्यानी दिवे लावले आणि त्यामुळेच सर्व त्यांना देव अवतार मानायला लागले. साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिवशी दिव्याच्या तेजाने झळाळत असताना बाबांची व्दारकामाई मात्र आंधारात होती. त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिप्रीने व्दारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला. लहान मुलीच्या अग्राहा खातर बाबा तयार झाले. मात्र, त्यांना दिवे लावण्यासाठी कोणीही तेल दिले नाही. त्यामुळे बाबांनी पाण्यानी दिवे पेटविले आणि पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो अशर्चेय चकीत झाला. तेंव्हापासून साईबाबाच्या शिर्डीत दिवाळीला एक वेगळे महत्व प्राप्त झाले. दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण मानला जातो. तरीही अनेक भक्त साईबाबांसोबत हा सण साजरा करण्यासाठी शिर्डीत येतात. बाबांची व्दारकामाई आणि नंदादीप परिसरात आपले श्रद्धेचे दिवे लावून साईबाबांबरोबर दिवाळी साजरी करतात. मात्र, यंदाचा वर्षी कोरोनामुळे साई मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांनी यंदाची दिवाळी आपल्या घरी साजरी करण्याचे आवाहन साई संस्थानच्यावतीने भाविकांना करण्यात आले आहे.
दिवाळीनिमित्ताने साई मंदिराला विविध प्रकारची रोषणाई-
दिवाळी निमित्ताने साई मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी केली जात आहे. कागद आणि बांबूच्या कामट्यापासून तयार केलेले आकर्षक आकाश कंदील साई मंदीर परिसरात लावण्यात आले आहे. दिवाळीच्या या शुभ मुहर्तावर साईबाबा मंदिराला विविध रंगांच्या प्रकाशाने सजवण्यात आले आहे. साईबाबा मंदिरात विवीध फुलांची आसर करण्यात आली आहे. आज संध्याकाळी साई मंदिरात पारंपारीक पध्दतीने लक्ष्मी-कुबेर पुजनाचा सोहळा होणार आहे. मात्र, यंदा प्रथम भाविक आणि ग्रामस्थांनविना हा सोहळा पार पडत आहे. कोरोनामुळे साई मंदीर भक्तांना दर्शनासाठी बंद असल्याने भक्तांना आज ऑनलाईन लक्ष्मीपुजन आणि साईचे दर्शन घ्यावे, असे आवाहन साई संस्थानच्यावतीने भाविकांना करण्यात आले आहे. देशात ऑनलॉक सुरू झाल्यानंतर भाविक आपल्या साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येत आहे. मात्र, मंदीर बंद असल्याने भाविक साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन स्वतः ला धन्य मनात आहे. आज देखील दिवाळी निमित्ताने हजारो भाविक सकाळ पासून शिर्डीत आले असून साई मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
साईबाबांच्या शिर्डीत यंदा भाविकांविना दिवाळी!
यंदा कोरोना महामारीमुळे साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने संस्थानच्यावतीने भाविकांविना हा सण यंदा साजरा करण्यात येत आहे.
साईबाबांच्या शिर्डीत यंदा भाविकांविना दिवाळी!