अहमदनगर -राज्यात वाढत्या कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता ( Covid Restriction In Maharashtra ) राज्य शासनाने 9 जानेवारीच्या रात्रीपासून राज्यात विविध निर्बंध आणले आहेत. यामध्ये राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय येत्या 16 फेब्रुवारी ( School Closed In Maharashtra ) पर्यंत बंद ठेवण्यात येईल, असा आदेश काढलेला आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरे बाजार ( Hivrebajar School Open ) येथील शाळा सुरू आहे. याबाबत हिवरेबाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार ( Popatrao Pawar On Hirebajar School ) यांनी स्पष्ट केले आहे की, गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने आम्ही शाळा सुरू ठेवली आहे.
'विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त करू नका' -
शासनाने ज्या ठिकाणी कोरोनाचा पादुर्भाव कमी आहे, अशा ठिकाणच्या शाळा सुरू ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांचे भविष्य सुरक्षित राहिल, असे पोपटराव पवार यांचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांनीही शाळा बंद केली, तर आम्ही ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा दिलेला आहे.