नेवासा -पुणे येथील दिशा परिवार व प्रभात' वृत्तपत्र समुहाच्या संयुक्त विद्यमाने नेवासा फाटा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास व करियर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध विनोदी लेखक, कथाकथनकार संजय कळमकर, दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण , श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे यश संवाद विभागाचे प्रमुख प्रा. देविदास साळुंखे, सुंदराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे, दैनिक प्रभातचे महाव्यवस्थापक बी. एल. स्वामी, वित्त विभागप्रमुख रवी इंडी, दैनिक प्रभात नगर आवृत्तीचे चे संपादक जयंत कुलकर्णी तसेच चिन्मय कुलकर्णी, अमित इंगळे व आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
समाजात रंग, जातीवरुन फुट - सध्याच्या समाजामध्ये जाणिवा जागृत राहिलेल्या नाही, न्यूनगंड वाढत आहे. धर्म , रंग , जात यानुसार समाज विभागात आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपल्या क्षमता जागृत करणे आवश्यक आहे आणि त्या करण्याचे काम दिशा परिवार आणि दैनिक प्रभात यांच्या सारखी लोक पुढे येऊन आदर्श समजा घडवत आहे असे संजय कळमकर यांनी बोलताना मत व्यक्त केले. गरिबी खूप काही शिकवते , आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते त्यामुळे त्याचे भांडवल न करता आपल्या जाणिवा जागृत ठेवून कार्य करत राहा. अशा कार्यामध्ये काम करणारे व्यक्ती हे आधुनिक काळातील कर्ते -सुधारक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत -दिशा परिवार गेल्या १६ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे, विद्यार्थी ही जात आणि शिक्षण हा धर्म मानून संस्था काम करत आहे. संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्रातील पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मदत केले, त्यांच्या सर्वागीण विकासासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी घडावा , त्याचे कुटुंब उभे राहावे आणि समाजाप्रती त्याचे असणारे कर्तव्य पूर्ण करावे एवढीच अपेक्षा संस्था त्यांच्याकडून ठेवते. काही विद्यार्थी ती पूर्ण करतात तर काही विद्यार्थी यामध्ये कमी पडतात अशी खंत दिशा परिवाराचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केली.
व्यक्तिमत्व विकासासाठी दिशा परिवार पाचवी दिशा - आपल्या सगळ्यांना पूर्व - पश्चिम- उत्तर- दक्षिण या दिशा माहिती आहे. पण आधुनिक समाजामध्ये तुमचे व्यक्तिमत्व विकास सुधारण्यासाठी दिशा परिवार ही पाचवी दिशा काम करत आहे असे मत श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे यश संवाद विभागाचे प्रमुख प्रा. देविदास साळुंखे यांनी व्यक्त केले. समाजातील चौकट मोडण्याचे काम समाजसेवक करतात. त्यापद्धतीने समाजातील जो वंचित आहे, नाही रे वर्गातील आहे त्यांना शिक्षण देऊन सुधारण्याचे काम दिशा परिवारातील समाजसेवक करत आहे असे प्रतिपादन सुंदराबाई कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता पानसरे यांनी केले.
हेही वाचा -MP Sujay Vikhe on Congress : काँग्रेसमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप; खासदार सुजय विखे यांचे भाकीत