अहमदनगर - साईभक्त असलेल्या श्री तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांनी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबाच्या समाधी दर्शनानंतर वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांनी साई संस्थानला 10 लक्ष रुपयांची देणगीही दिली आहे.
तिरुपती बालाजी देवस्थानचे अध्यक्ष साईचरणी; 10 लाखांची दिली देणगी - तिरूपती देवस्थानचे अध्यक्ष शिर्डीला
सुब्बारेडी नेहमीच साई दर्शानसाठी येत असतात. मात्र यावेळी त्यांनी साई चरणी दहा लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी तिरुपतीचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांच्या कडुन देणगीचा धनादेश स्विकारला. साई संस्थानच्या वतीने वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांना शॉल घालत आणि साईबाबांची मुर्ती देत सत्कार करण्यात आला.
सुब्बारेडी नेहमीच साई दर्शानसाठी येत असतात. मात्र यावेळी त्यांनी साई चरणी दहा लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी तिरुपतीचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांच्या कडुन देणगीचा धनादेश स्विकारला. साई संस्थानच्या वतीने वाय.व्ही. सुब्बारेड्डी यांना शॉल घालत आणि साईबाबांची मुर्ती देत सत्कार करण्यात आला. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त जयंत जाधव, राहुल कनाल, अविनाशजी दंडवते, महेंद्रजी शेळके आदी उपस्थित होते.