शिर्डी(अहमदनगर) - दिवाळीच्या निमित्ताने शिर्डीतील साईबाबा मंदिर आणि परिसर दिव्यांनी लखलखून गेला आहे. साई मंदिरासह शिर्डी विद्युत रोषणाईने नटून गेली आहे. साईबाबांच्या द्वारकामाई समोरील प्रांगणात भाविकांनी दिपोत्सव साजरा केला आहे. भाविकांनी पेटवलेल्या दिव्यांनी अवघा आसमंत उजळून निघाला होता. याच दिवशी साईबाबांनी आपल्या काळात पाण्यांनी दिवे पेटवले होते असे सांगितले जाते. त्याचेच स्वरूप मानून आज भाविकांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांची शिर्डी दिव्यांनी उजळून टाकली.
दिवाळीनिमित्ताने साईनगरीत दिपोत्सव शिर्डीत साईबाबांचे एका पडक्या मशिदीत वास्तव्य होते, जिला ते द्वारकामाई म्हणून संबोधत. बाबांनी याच ठिकाणी आपल्या जीवनकाळात अनेक चमत्कार केले, ज्यात सर्वात महत्वाचा चमत्कार म्हणजे दिपावलीत साईबाबांनी पाण्यांनी दिवे लावले आणि त्यामुळेच सर्व त्यांना देवअवतार मानायला लागले, असे सांगतात.
दिवाळीनिमित्ताने साईनगरीत दिपोत्सव हेही वाचा -'व्होकल फॉर लोकल'ला सोलापुरातून उदंड प्रतिसाद; स्थानिक पणत्या खरेदीसाठी प्राधान्य
- साईबाबांच्या काळातील दिवाळी -
साईबाबांच्या काळात संपूर्ण शिर्डी दिवाळीच्या दिवशी दिव्यांच्या तेजाने झळाळत असताना, बाबांची द्वारकामाई मात्र अंधारात होती. त्यामुळे बाबांची भक्त असलेली झिप्रीने द्वारकामाईत दिवे लावण्याचा आग्रह धरला. लहान मुलीच्या आग्राहामुळे बाबा तयार झाले. मात्र, त्यांना दिवे लावण्यासाठी कोणीही तेल दिले नाही. त्यामुळे बाबांनी पाण्यांनी दिवे पेटवले. पडक्या मशिदीत प्रकाश पाहून जो तो चकित झाला. तेव्हापासून साईबाबांच्या शिर्डीत दिपावलीला एक वेगळं महत्व प्राप्त झाले आहे.
दिवाळीनिमित्ताने साईनगरीत दिपोत्सव साईंच्या नंदादीप समोर आणि लेंडीबागमध्ये भाविक दररोज दिवे लावतात. मात्र, कोरोनामुळे साई संस्थानच्यावतीने मंदिर परिसरात भाविकांना यंदाच्या वर्षीही दिवे लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी भाविक द्वारकामाई समोरील प्रांगणात दिवे लावत आहेत. दिवाळीच्या प्रकाश पर्वात हा नजारा अजूनच उजळून निघतो.
दिवाळीनिमित्ताने साईनगरीत दिपोत्सव साई मंदिराच्या गेट क्रमांक चारच्या समोरच आकर्षक आकाशकंदील नजरेत भरतो, तर साईबाबांच्या द्वारकामाई तसेच चावडीला आकाशकंदील लावण्यात आले आहेत. साई मंदिरालाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रत्येक जण दीप प्रज्वलीत करून बाबांच्या सानिध्यात दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करतात. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी साईमंदिर लखलखून जाते आणि त्याचे कारण म्हणजे साईबाबा प्रत्येकाच्या श्रद्धास्थानी आहेत.
हेही वाचा -वाडेश्वर कट्ट्यावर तोंड गोड करत राजकीय विरोधकांचे दिवाळी सेलिब्रेशन