महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई संस्थानाच्या कार्यकारी अधिकारीपदी दिपक मुगलीकरांची नियुक्ती - shirdi sansthan

शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी दिपक मुगलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी साईबाबांचे सहपत्नीक दर्शन घेऊन मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडुन साई संस्थाचा पदभार स्विकारला.

रूबल अग्रवाल यांच्याकडुन पदभार स्विकारताना दिपक मुगलीकर

By

Published : Mar 28, 2019, 10:38 PM IST

अहमदनगर- शिर्डी साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी दिपक मुगलीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांनी साईबाबांचे सहपत्नीक दर्शन घेऊन मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडुन साई संस्थाचा पदभार स्विकारला.

पदभार स्विकारल्यानंतर बोलताना दिपक मुगलीकर

मुगळीकर यांच्याकडे औरंगाबादच्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या सचिवपदाचा अतिरीक्त पदभारही असणार आहे. दुपारी मध्यान्ह आरतीपुर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांच्याकडुन मुगलीकर यांनी कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अग्रवाल यांनी साईसच्चरित्र देऊन मुगळीकर यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी संस्थानाच्या कामकाजाविषयी अग्रवाल यांच्याकडुन माहिती जाणुन घेतली.

शिर्डीत येणाऱ्या भाविकांना साईदर्शनाबरोबर इतर सुविधा अधिक चांगल्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदभार स्वीकारताच त्यांनी विविध विभागांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details