महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ढोल बजाओ, सरकार जगाओ आंदोलन'; राहुरीत धनगर समाज आक्रमक - धनगर समाज आंदोलन

येत्या काही दिवसात राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा धनगर आंदोलनादरम्यान देण्यात आला.

ahmednagar protest news
'ढोल बजाओ, सरकार जगाओ आंदोलन' ; राहुरीत धनगर समाज आक्रमक

By

Published : Sep 26, 2020, 1:02 PM IST

अहमदनगर -राहुरी तहसील व पोलीस स्टेशनवर धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ ,सरकार जगाओ आंदोलन करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार..अशी घोषणाबाजी करत धनगर समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली. येत्या काही दिवसात राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण धनगर समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. धनगर समाजाच्या वतीने जिल्ह्यातील मंत्री प्राजक्त तनपुरे, शंकरराव गडाख आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या घरांसमोर मेंढरांचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सांगितले. तसेच धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात जाब विचारला जाईल, अशी माहिती यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजयराव तमनर यांनी दिली आहे.

राहुरी तहसील कार्यालयावर धनगरी वेशभूषा करून तसेच काठी, घोंगडी, आदी धनगरी वेशात धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. येळकोट येळकोट जय मल्हार, ढोल बजाओ सरकार जगाओ.या घोषणाबाजीने राहुरीत निदर्शने झाली.

या मोर्चाचे निवेदन राहुरीचे तहसीलदार फसियैदिन शेख साहेब, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख साहेब, यांच्या उपस्थित देण्यात आले. या धनगर समाजाला योग्य प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी शासन, प्रशासन योग्य प्रकारे सहकार्य करणार असल्याचे आश्वासन शेख यांनी दिले. यानंतर तहसील कार्यालयावर उपस्थित धनगर समाजातील बांधवांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुका येथे धनगर समाजाचा पहिला मोर्चा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या घरासमोर काढण्यात येणार असल्याचा ठराव पास करण्यात आला.

या आंदोलनाला यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख विजय तमनर व जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षा वैशालीताई नान्नोर, अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे ज्ञानदेव बाचकर, पुण्य श्लोक मल्टीपर्पजचे चेअरमन दत्ताभाऊ मतकर, दादाभाऊ तमनर, महेशराव तमनर,सखाराम तमनर, आप्पासाहेब तमनर, मुळाधरणग्रस्त संघटनेचे मारुती दादा बाचकर उपस्थित होते. हे आंदोलन मास्क ,सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून पार पडले.

ABOUT THE AUTHOR

...view details