महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंकजा आणि सुजयचे भाऊ-बहिणीचे नाते मद्यनिर्मितीतून - धनंजय मुंडे - धनंजय मुंडे

धनंजय मुंडे म्हणाले, प्रवरा देशी बनवते तर त्या विदेशी बनवतात. त्यांच्यातील भाऊ-बहिणीचे नातेसंबंध मद्य निर्मितीतून निर्माण झाले आहेत.

धनंजय मुंडे १

By

Published : Apr 21, 2019, 8:58 PM IST

अहमदनगर- डॉ. सुजय विखे आणि पंकजा मुंडे सध्या भाऊ-बहिणीचे नाते सांगत आहेत. त्यांच्यातील हे नातेसंबंध मद्य निर्मितीतून निर्माण झाले आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. पाथर्डी इथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे म्हणाले, प्रवरा देशी बनवते तर त्या विदेशी बनवतात. मुंडे यांनी डॉ. सुजयचा उल्लेख कुजय करत कुजय यांना ऊसतोड मजुरांचे प्रश्न कधीपासून समजायला लागले. जिल्ह्यात आघाडीला अनुकूल वातावरण असून संग्राम जगताप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details