महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

God Shanishwara Darshan अमावास्येनिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनिशिंगणापुरच्या शनैश्वराचे दर्शन

अहमदनगर जिल्हयातील Ahmadnagar District शनिशिंगणापुर Shanishinganapur येथे दर्श पिठोरी आमावास्येनिमित्त भरलेल्या यात्रेत दिवसभरात चार लाख भाविकांनी भेट देवून शनिदेवाचे God Shanishwara दर्शन घेतले. शनैश्वर देवस्थान ट्रस्टने Shanaishwar Devasthan Trust वाहनतळ, दर्शन व्यवस्था, आरोग्य टीम, रुग्णवाहिका सुरक्षा, आदीबाबत काटेकोर नियोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते आरत्या पार पडल्या.

shanishingnapur
शनिशिंगणापूर

By

Published : Aug 28, 2022, 9:56 AM IST

शनिशिंगणापूर अहमदनगरअहमदनगर जिल्हयातील Ahmadnagar District शनिशिंगणापुर Shanishinganapur येथेदरवर्षी दर्श पिठोरी आमावास्येनिमित्त मोठी यात्रा भरते. यंदा पार पडलेल्या यात्रेत दिवसभरात चार लाख भाविकांनी भेट देवून शनिदेवाचे दर्शन God Shanishwara Darshan घेतले. यावेळी, शनैश्वर देवस्थान ट्रस्टने Shanaishwar Devasthan Trust वाहनतळ, दर्शन व्यवस्था, आरोग्य टीम, रुग्णवाहिका सुरक्षा, आदीबाबत काटेकोर नियोजन केले होते. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. आमावास्या दुपारपर्यंतचं असल्याने सायंकाळनंतर गर्दीचा ओघ कमी झाला होता.

मान्यवरांच्या हस्ते आरत्या पार पडल्याशुक्रवारी रात्री बारा वाजता राहुल गोडसे यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. शनिवारी पहाटे साडेचार वाजता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, Chandrakant khaire मेहतानी व ऑस्ट्रेलियाचे शनिभक्त राकेशकुमार यांच्या हस्ते आरती झाली. दुपारची मध्यान आरती झिंबांब्वे येथील शनिभक्त जयेश शहा यांच्या हस्ते झाली. सायंकाळची आरती ओरिसाचे आरोग्य मंत्री नब किशोरी दास यांच्या हस्ते पार पडली. माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख shankarrao gadakh माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले shivajirao kardile सह अनेक मान्यवरांनी भेट देवून दर्शन घेतले.

असे होते नियोजन पंकज मित्तल दिल्ली, मेहता मंडळ मुंबई, शनिदेव सेवा समिती हरियाणा, विशाल भांडारा दिल्ली, अशोक गर्ग सिरसा व बबलूभाई मित्र मंडळाने आलेल्या भाविकांने चहा, खिचडी, नाश्ता व जेवणाचा प्रसाद वाटला. वाहनांची गर्दी वाढल्यानंतर मुळा कारखाना गेट व शनैश्वर रुग्णालय येथील वाहनतळावर वाहने लावून भक्तांना दोन किलोमीटर पायी जावून दर्शन घ्यावे लागले. वाहतूक पोलिसांबद्दल तक्रारीचा सूर मोठ्या प्रमाणात होता.

भाद्रपद अमावस्येचा होता योगभाद्रपद अमावस्या 2022 म्हणजेच शनि अमावस्या Shani Amavasya In Bhadrapada शनिवार, 27 ऑगस्ट 2022 रोजी आहे. भाद्रपद अमावस्या 26 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 12.23 पासून सुरू होईल. तो दुसऱ्या दिवशी शनिवार, 27 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1:46 वाजता संपेल. जेव्हा अमावस्या शनिवारी येते तेव्हा तिला शनि अमावस्या किंवा शनि अमावस्या म्हणतात. भाद्रपद अमावस्या शनि अमावस्या व्यतिरिक्त आणखी एक दुर्मिळ योगायोग घडत आहे. या दिवशी, शनि ग्रह स्वतःच्या राशीत मकर राशीत उपस्थित असेल. शनिवार हा शनिदेवाला समर्पित असल्याने आणि या अमावास्येला शनी आपल्याच राशीत मकर राशीत राहणार आहे. या कारणास्तव शनिदेवाच्या प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास आहे.

हेही वाचा Horoscope साप्ताहिक राशीभविष्य, जाणून घ्या कसा असेल हा आठवडा

ABOUT THE AUTHOR

...view details