शिर्डी- देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्येही महाशिवरात्रीला विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले. यासाठी साईनगरीत भाविकांनी गर्दी केली आहे. साई संस्थानच्या प्रसादालयात दिवसभरात 15 हजार किलोची शाबुदाणा खिचडी प्रसाद स्वरुपात दिली जात आहे.
महाशिवरात्रीनिमित्ताने भाविकांची साईनगरीत मांदियाळी - mahashivratri in shirdi
देशभरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्येही महाशिवरात्रीला विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले.
आज महाशिवरात्रनिमित्ताने राज्यातील नागरिकांसह देशभरातून भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले आहेत. साई समाधीवर महादेवांची प्रतिमा ठेवण्यात आली आहे. याबरोबरीने साई मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. शिर्डीला येणाऱ्या भाविकांना उपवास असल्याने साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर शाबुदाणा खिचडी जेवण म्हणून देण्यात येत आहे. यासाठी प्रसादालयात 6 हजार 300 किलो शाबुदाणा 4 हजार 450 क्विंटल शेंगदाणे, 1 हजार किलो तूप, साखर 450 किलो, मीठ 450 किलो, 114 किलो लाल मिरची पावडर, हिरवी मिरची 250 किलो आणि बटाटा 3 हजार 500 किलो आदी वापरून बनवलेली खिचडी आणि त्याबरोबर झिरक्याच्या प्रसादाचा भक्त मोठ्या आनंदाने आस्वाद घेत आहेत.