शिर्डी (अहमदनगर)- शिर्डीत नाताळाची सुट्टी आणि नव्या वर्षाचे स्वागत साईबाबांच्या दर्शनाने करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र, यावर्षीही कोरोनाचे सावट कायम असल्याने साईभक्तांनी शिर्डीत येताना ऑनलाइन दर्शन पास ( Shirdi Online Darshan Pass ) घेऊनच यावे. तसेच गर्दी टाळण्यासाठी पायी पालख्या घेऊन येऊ नये ( Don't Come With Palanquins Shirdi ) असे आवाहन साईबाबा संस्थानने ( Sai Baba Trust Shirdi ) केले आहे.
भाविकांनी शिर्डीला पायी पालखी घेऊन येऊ नये, साईबाबा संस्थानचे आवाहन मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय नाही
यावर्षी 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले ठेवायचे की नाही, याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. शिर्डीत नाताळाच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त ( Christmas New Year Celebration ) भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी कोरोनाचा धोका ( Covid 19 Threat ) आहे. शिर्डीत दिवसभरात ऑफलाईन आणि ऑनलाईन पासेसद्वारे पंचवीस हजार भक्तांना दर्शन दिले जाते. त्यामुळे गर्दीच्या काळात भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी, साई दर्शनाला येताना भाविकांनी ऑनलाईन दर्शन पास घेऊनच शिर्डीला यावे. यासह पायी पालखी घेऊन येणाऱ्या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
गर्दीचे नियोजन सुरू
नाताळची सुट्टी, नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त 25 डिसेंबर ते रविवार 2 जानेवारी 2022 या कालावधीत गर्दी होत असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले ठेवण्यास साई संस्थानने सुरवात केली आहे. यावर्षी ओमायक्रॉन या कोरोना व्हॅरिएंटचा धोका ( Omicron Variant Threat ) आणि मर्यादित भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था शिर्डीत केली आहे. येत्या 24 डिसेंबरनंतर आलेला शनिवार आणि रविवार या दिवशी होणाऱ्या गर्दीचे नियोजन साई संस्थान करत आहे.