शिर्डी:गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई येथील राजदिप गुप्ता आपल्या परिवारासह साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. यावेळी त्यांचा बरोबर शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते आणि साई संस्थानचे विश्वत (Trustee of Sai Sansthan) उपस्थित होते. मुंबई येथील गुप्ता परिवार शिर्डी साईबाबांचे परमभक्त (devotee of Shirdi Sai Baba) असुन यांनी या आधीही साईबाबांना गुप्त स्वरूपात दान दिले आहे असे कोते यांनी सांगितले. मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने साईबाबांना काही तरी सुवर्ण दान भेट स्वोरूपात देण्याची ईच्छा गुप्ता परिवाराची होती.
Gold Crown To Sai Baba : साईबाबांच्या चरणी भक्ताने वाहिला 30 लाखाचा सुवर्ण मुकुट - Trustee of Sai Sansthan
मराठी नववर्षाच्या निमित्ताने मुंबई येथील राजदीप गुप्ता या साईभक्त परिवाराने (Devotees offered) शिर्डीच्या साईबाबांना 800 ग्राम वजनाचा सुवर्ण मुकुट (gold crown worth Rs 30 lakh to Sai Baba ) अर्पण केला आहे. या सुवर्ण मुकुटाची किमत तब्बल 30 लाख रुपयांच्या आसपास आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर साईबाबांना आलेले हे सर्वात मोठे सुवर्ण दान (This is the biggest gold gift to Sai Baba) असल्याचे सांगितले जात आहे.

साईबाबांना सोन्याचा मुकुट
शनिवारी रात्री गुप्ता कुटुंबीय साईबाबांचा मंदिरात आले त्यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत साेबत आणलेला 800 ग्राम वजनाचा आणि 30 लाख रुपये किमतीचा सुवर्ण मुकुट साईबाबा संस्थानला सुपुर्त केला आहे. कोरोनामुळे साईबाबांच्या दान बरोबर भेट वस्तू तसेच भाविकांना मध्येही मोठी घट झाली होती. आता कोरोनाचे नियम शिथिल झाल्याने भविकानाची ओघही हळुहळु वाढण्यास सुरु झाली आहे.
हेही वाचा -साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठीचा श्रुंगार, मंदिरावरच्या कलशावर उभारली गुढी