अहमदनगर (शिर्डी) - कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली, तरी अद्याप शिर्डीतील साईबाबांचे मंदीर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आलेले नाही. साई मंदीर बंद असतानाही शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होताना दिसून येत आहे.
ई-पास लगत नाही

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर नगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश जिल्हे अनलॉक झाले आहेत. राज्यात प्रवास करण्यासाठी ई-पासही लगत नाही. त्यामुळे भाविकांना शिर्डीला यायला अडचणी नाहीत. या पार्श्वभूमीवर शिर्डीत भावीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. शिर्डीत व्यवसायांना मुभा देण्यात आली असल्याने, साई मंदीराचा परीसर काहीसा गजबलेला दिसून येत आहे. शिर्डीकडे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, भावीक कळसाचे दर्शन घेऊन, बाहेरूनच साई बाबांच्या आरतीचा लाभ घेत आहेत.
'सरकारचा आदेश आला, की लगेच मंदिर सुरु करता येणार'
राज्य सरकारने मंदिर उघडण्यास परवानगी दिल्यास, आवश्यक त्या उपायोजनेसह साई मंदिर उघडण्यात येईल. मागील लाटेत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या सुविधा आणि अनुभव पाहता आता पुन्हा मदीर सुरु करताना, अधिकची काळजी घेतली जाणार आहे. दरम्यान, भक्तांना दर्शन घेणे अधिक सुलभ कसे होईल याची तयारीही संस्थानने केली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे. दरम्यान, सरकारने आता मंदिर खुले करावे अशी मागणी भाविकांसह शिर्डी ग्रामस्थही करत आहेत.