महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा, भाविकांची मागणी - अहमदनगर शिर्डी साई संस्थान लेटेस्ट न्यूज

साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होऊन आज चार महिने होत आले आहेत. मात्र, साई संस्थानकडून दिला जाणारा लाडू-प्रसाद अद्यापही सुरू केला नाही आहे. तर, दुसरीकडे शिर्डीतील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री सुरू केली आहे. या दुकानदारांकडून भाविकांना चढ्या दरात लाडूची विक्री केली जात असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. ही लूट थांबवण्यासाठी साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा
साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा

By

Published : Feb 20, 2021, 12:25 PM IST

Updated : Feb 20, 2021, 1:51 PM IST

शिर्डी (अहमदनगर) -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा साई मंदिर खुले होऊन चार महिने होत आले आहेत. साईबाबा संस्थानकडून भाविकांना देण्यात येणारा लाडू-प्रसाद अद्याप संस्थानने सुरू केलेला नाही. हा लाडू-प्रसाद सुरू करण्याची मागणी आता साईभक्त करत आहेत.

साई संस्थानने लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा, भाविकांची मागणी
साई संस्थानच्या लाडू-प्रसादाची वाढती मागणी

शिर्डी साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी दररोज देश-विदेशातून हजारो भाविक शिर्डीत येत असतात. येथून परतताना ते साईबाबांचा लाडू-प्रसाद घेऊन जातात. साईबाबांचा प्रसाद म्हणून साई संस्थानकडून तयार करण्यात येणारे साजूक तुपात बनवलेल्या बुंदीचे लाडू प्रसिध्द आहेत. दिवसेंदिवस या प्रसादाची मागणी वाढत आहे. यासाठी साईबाबा संस्थानमध्ये स्वतंत्र विभाग आहे. साई संस्थानकडून बुंदी तयार करून तिचे लाडू बनवणे तसेच, त्यांचे पॅकींग करून एका पाकिटात तीन लाडू पॅकींग करून एक पाकिट 25 रुपयांना दिले जाते. भाविकही या प्रसादाला पसंती देतात. टाळेबंदी संपल्यानंतर राज्यातील सर्वच प्रसिद्ध देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. त्याचबरोबर त्या देवस्थानांकडून भाविकांना दिला जाणारा प्रसादही सुरू करण्यात आला आहे. साईबाबा संस्थाननेही आपला लाडू-प्रसाद पुन्हा सुरू करावा, मागणी आता भाविक करत आहेत.

दुकानदारांकडून भाविकांची लूट

साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले होऊन आज चार महिने होत आले आहेत. मात्र, साई संस्थानकडून दिला जाणारा लाडू-प्रसाद अद्यापही सुरू केला नाही आहे. तर, दुसरीकडे शिर्डीतील काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानात थेट लाडू विक्री सुरू केली आहे. या दुकानदारांकडून एका लाडू पाकिटात चार लाडू पॅकिंग करून भाविकांना चढ्या दरात विक्री केली जात असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत आहेत. साईबाबा संस्थानने त्वरित आपला लाडू-प्रसाद सुरू करून भाविकांची होणारी लूट थांबावी आणि भाविकांना संस्थानचा लाडू-प्रसाद द्यावा, अशी मागणी होत आहे.

Last Updated : Feb 20, 2021, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details