शिर्डी- सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांच स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी गुरुवारी नव वर्षाच्या पूर्वसंध्येपासूनच साई दरबारात हजेरी लावली. गुरुवारी मध्यरात्री रात्री 12 वाजेच्या सुमारास भाविकांनी साईं मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी शेकडो भाविकांनी साईंचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात नव वर्षाचे स्वागत केले.
शिर्डीत भाविकांची मांदियाळी-
नवीन वर्ष साईंच्या दर्शनाने सुरू करण्यासाठी शिर्डीच्या साईमंदिराच्या दर्शनबारीसह मंदिर परीसरात भाविकांची मांदियाळी दिसून आली. ३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत बरोबर 12 वाजल्यानंतर नववर्षाची सुरवात साईंच दर्शनाने करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती. भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याच प्रकर्षाने जाणवले. तसेच ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही, त्यांनी साई समाधी मंदिराच्या कळसाच दर्शन घेत धन्यता मानली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने शेकडो भाविकांना रात्रीच साईंचे दर्शन घेता आले.