महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत साई मंदिरा बाहेर सोशल डिस्टन्सचा फज्जा - News about Shirdi Sai Baba Temple

शिर्डीत साई मंदिरा बाहेर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडालेला दिसला. या ठिकाणी भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंग ठेवल्याचे आणि मास्कचा वापर केल्याचे दिसत नाही आहे.

devotees-broke-the-rules-of-social-distance-outside-shirdi-sai-temple
शिर्डीत साई मंदिरा बाहेर सोशल डिस्टन्सचा फज्जा

By

Published : Feb 22, 2021, 3:24 PM IST

अहमदनगर - राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. यामुळे करोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे अवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मात्र, शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांकडून सोशल डिस्टन्सिंग ठेवल्याचे आणि मास्कचा वापर केल्याचे मात्र दिसत नाही आहे.

राज्यात करोणाचे रुग्ण आता पुन्हा वाढू लागल्याने नियमांची काटकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर आठ दिवस नियमांच पालन न केल्यास पुन्हा लॉक डाऊन करण्याचा इशारा प्रशासना कडून देण्यात आला आहे. शिर्डीत मात्र भाविकांची गर्दी वाढतच असून मंदीर वगळता बाहेर दोन भक्तांनमध्ये अंतर राखले जात नाही आहे. अनेक भक्त मास्क न लावता घोळक्यावे फिरतांना दिसत आहेत. साईंच्या दर्शनासाठी पास काढतांना आणि रांगेत उभे राहतांना भक्त अगदी चिटकुन उभे राहत असल्याचे दिसून आले आहे. कोरोणाला थांबवायच असेल तर नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र, लोकांनमध्ये अद्यापही जागरुकता नसल्याचे दिसुन येत आहे.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे काही शहरांमध्ये सरकारने केलेले लॉक डाऊन चिंता वाढवणारे आहे. त्यातच शिर्डी पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेने अनोखी गांधीगिरी करत दर्शनाला आलेल्या भाविकांना व रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिक्षेकरी, वृद्ध महिला आणि लहान बालके यांना मास्कचे वाटप करत स्वतः ची काळजी घेण्याचे आणि मास्क वापरून कोरोना पासून बचावाचे आवाहन केले आहे. यावेळी काही तरुणांना दंडात्मक कारवाईलासुद्धा यावेळी सामोरे जावे लागले आहे. आज वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई होत असतांना नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी गांधीगिरी करत वेगळा संदेशही दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details