माहिती देताना मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे रोजी दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर शिर्डी साईबाबा संस्थान देखील अलर्ट झाले आहे. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवाहन केले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत भाविकांनी साईबाबांच्या दानपेटीत दोन हजार रुपयांच्या नोटा टाकाव्यात, 30 सप्टेंबरनंतर भाविकांनी चलनातून बाद होणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा साई संस्थानच्या दानपेटीत टाकु नये, असे आवाहन यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी केले आहे.
4 कोटी रुपयांच्या नोटा संस्थानकडे पडून : शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक साईबाबांच्या दानपेटीत पैसे, दागिने आणि मौल्यवान वस्तूही टाकतात. केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटा बंदीचा निर्णय अचानक घेण्यात आला होता. त्यामुळे नोटा बदलून मिळण्याची शक्यता वाटत नसलेल्या, किंवा तो त्रास नको असलेल्या भाविकांनी या नोटा मोठ्या प्रमाणात साईबाबा संस्थानच्या दानपेटीत टाकल्या होत्या. साई संस्थानकडून नियमितपणे बँकेत भरणा केला जात असल्याने, मुदत आलेल्या नोटा बँकेत भरल्या होत्या. मुदत संपल्यानंतरही सुमारे 4 कोटी रुपयांच्या नोटा संस्थानकडे पडून आहेत.
नोटा बदलून घेण्यासाठी पुरेशी मुदत : या अनुभवावरून आता दोन हजार रुपयांच्या नोटबंदीनंतर काय होईल, याची उत्सुकता आहे. मात्र, मागील वेळी झाला एवढा त्रास आणि गोंधळ यावेळी होण्याची शक्यता कमी आहे. नोटा बदलून घेण्यासाठी पुरेशी मुदत आहे. त्यामुळे लोक नोटा बदलून घेऊ शकतील. शिवाय या नोटा दानपेटीत टाकल्या तरीही फारसा त्रास होणार नाही. साईबाबा संस्थानकडे आलेल्या दानाची मोजणी दर मंगळवारी आणि शुक्रवारी केली जाते. ही रक्कम लगेच बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे दोन हजारांच्या नोटा आल्याच तर त्या लगेच बँकेत जाणार आहेत.
दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण : 30 सप्टेंबरनंतर भाविकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा साई संस्थानच्या दान पेटीत टाकू नये, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवशंकर यांनी केले आहे. साई संस्थानच्या झालेल्या काही दिवसातील कँश काऊंटींगमध्ये दानपेटीत दोन हजारांच्या नोटा येण्याचे प्रमाण खूपच घटल असल्याचे समोर आले आहे. मात्र, पूर्वीच्या नोटबंदीनंतर जुन्या नोटा दानपेटीत येण्याचे प्रमाण वाढले होते. तसेच दोन हजाराच्या नोटांचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज आहे.
हेही वाचा -
- Gurupournima Festival अश्या पद्धतीने साजरा होणार साईंच्या मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव
- Ram Navami In Shirdi रामनवमीसाठी शिर्डी सजली 97 हजार चौफुटांच्या मंडपासह भक्तांसाठी विविध सुविधा
- Sai Baba साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआयएसएफची सुरक्षा विचाराधिन नव्या सुरक्षेला शिर्डीकरांचा विरोध