नेवासा (अहमदनगर) -कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेले नेवासा तालुक्यातील देवगड येथील देवस्थान गुरुदत्त दर्शन सोमवारी सुरू करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवून रोज फक्त एक ते दीड हजार भाविकांना दर्शन दिले जाणार आहे.
देवगड येथील गुरुदत्त देवस्थान खुलं... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे दिवाळी पाडव्यापासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. भाविक तसेच व्यावसायिकांनी आज सकाळपासून दर्शनासाठी उपस्थित दर्शवली होती. दिवसभरात अनेकांनी आपापल्या दुकानांची साफसफाई केली. भाविकांच्या स्वागतासाठी दुकाने सज्ज झाली आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानने पाच वर्षाखालील मुले व 65 वर्षांपुढील ज्येष्ठांना मंदिरात प्रवेश नाकारला आहे. रोज एक ते दीड हजार भाविकांनाच दर्शन दिले जाणार आहे. पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था तसेच हातपाय धुणे, प्रत्येकांचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरची सोय ही देवस्थानकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -किसान सभेच्या 'लेटर टू पी.एम.' मोहिमेला चांगला प्रतिसाद, पतप्रधानांना शेतकऱ्यांनी पाठवली हजारो पत्रे
हेही वाचा -शनिशिंगणापूरमधील शनीचे मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले, मात्र दर्शनासाठी तुरळक गर्दी