शिर्डी (अहमदनगर)Devendra Fadnavis drama :शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज नाशिक दौऱ्यानंतर दिल्लीला जाण्याआधी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. त्यानंतर साईबाबांकडे काय मागितलं या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना राजकारणातील स्वाभिमानी (मी) व्यक्ती साईबाबांच्या चरणी काय प्रार्थना करणार? सध्या महाराष्ट्रावर असलेलं संकट दूर व्हावं. महाराष्ट्र गुलामगिरीतून मुक्त व्हावा. राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यावे यासाठी राज्यात चांगलं सरकार यावं, अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली असल्याचं उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. (Sanjay Raut Shirdi)
त्यावेळी शिंदे गोधडीत होते :आम्ही ठाकरे गट वगैरे म्हणत नाही. आम्ही शिवसेना म्हणतो. शिवसेना स्थापन करायला एकनाथ शिंदे कुठे गेले होते? 55 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेना स्थापन केली होती का? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केलीय. त्यावेळी एकनाथ शिंदे गोधडीत होते, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर करत शिवसेना ही बाळासाहेबांची असल्याचं म्हटलं आहे.
श्वेतपत्रिका काढण्याची मागणी योग्य : 'शासन आपल्या दारी' याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी योग्य आहे. 'शासन आपल्या दारी' त्या निमित्तानं होणारा वारेमाप खर्च हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे.
आमदार अपात्रता निकाल :सुप्रीम कोर्टानं न्यायदानाची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ते सो कॉल्ड न्यायाधीश आहेत. न्याय देणारे काल मुख्यमंत्र्याकडे गेले. बंद दाराआड चर्चा केली ते फुटताना दिसतायेत. न्याय देणारेच आरोपीकडे चहा पित असतील तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलयं.