अहमदनगर - जानेवारी महिना सुरू झाला तरी राज्यात काही ठिकाणी जोराचा पाऊस आणि गारांचा वर्षाव होत आहे. राज्याच्या मध्यभागी असलेले अहमदनगर शहर मात्र थंडीने गारठले आहे. शनिवारी सकाळी नगर शहर धुक्यात हरवलेले दिसले.
मागील काही दिवसांपासून शहरात थंडीचा कडाका वाढत आहे. मधून-मधून ढगाळ वातावरणही होत आहे. त्यामुळे वातावरणातील आर्द्रता वाढून धुके पडत आहे. नगरकरांनी शहरातील वातावरणाला काश्मीर, कुलू-मनाली, महाबळेश्वर, पचगणीची उपमा दिली.